आईच्या आजाराचा खर्च वाढला; तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:59 PM2020-01-22T12:59:04+5:302020-01-22T12:59:26+5:30

भादली/ जळगाव : आईच्या आजारपणावर उपचार व औषधीसाठीचा खर्च पेलवला जात नसल्याने सुशांत छोटूराम इंगळे (१९) या तरुणाने राहत्या ...

Costs of maternal illness increased; Youth suicide | आईच्या आजाराचा खर्च वाढला; तरुणाची आत्महत्या

आईच्या आजाराचा खर्च वाढला; तरुणाची आत्महत्या

Next

भादली/ जळगाव : आईच्या आजारपणावर उपचार व औषधीसाठीचा खर्च पेलवला जात नसल्याने सुशांत छोटूराम इंगळे (१९) या तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत याची आई उषाबाई ही पोटाच्या विकाराने ग्रस्त आहे. त्यांना दवाखान्यासाठी मोठा खर्च लागत आहे. तशाही परिस्थितीत आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करते तर बहिण पूजा ही देखील येवला, जि.नाशिक येथे नर्सिंगचा कोर्स करीत आहे.
तिलाही शिक्षणासाठी खर्च लागत आहे. सुशांत पंधरा दिवसाचा असतानाच वडीलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सुशांतवर होती. ट्रॅक्टरवर मजुरीचे काम करुन मोठी कसरत होत होती. आईचे आजारपण, बहिणीचा शिक्षणाचा खर्च पेलवू शकत नसल्यामुळे नैराश्य आलेल्या सुशांतने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या.

आई शेतात तर घरी मुलाची आत्महत्या
सुशांतची आई उषाबाई मंगळवारी गावातीलच राजेश पाटील यांच्या शेतात मजुरीच्या कामाला गेली होती. त्यामुळे सुशांत हा एकटाच घरी होता. दुपारी एक वाजता सुशांत हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत शेजारच्या लोकांना दिसला. त्यांनी राजेश पाटील यांना ही घटना कळविली.पाटील यांनी दुचाकीवरुन उषाबाई यांना घरी आणले. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईने हंबरडा फोडला.तिची शुध्द हरपली होती. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Costs of maternal illness increased; Youth suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.