घणकचरा प्रकल्प जैसे थे स्थितीत
By admin | Published: February 9, 2017 12:27 AM2017-02-09T00:27:10+5:302017-02-09T00:27:10+5:30
२००४ मध्ये झाली होती सुरुवात : आता नव्याने प्रक्रिया राबविण्याची गरज
भुसावळ : जिल्ह्यात सर्वात मोठी आणि सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या भुसावळ नगरपालिकेचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि पालिकेच्या आर्थिक स्थितीत वाढ होणारा महत्त्वाकांक्षी घनकचरा प्रकल्प तब्बल आठ वर्षांपासून जैसे थे स्थितीत असल्याची स्थिती आहे.
भुसावळ तालुक्यातील आणि शहरापासून साधारण पंधरा कि. मी. अंतरावरील गोजोरे गावा लगत भुसावळ नगरपालिकेचा हा घनकचरा प्रकल्प सध्या धूळ खात पडून असल्याचे वास्तव आहे.
मधल्या काळात या प्रकल्पाकडे शासन व लोकप्रतिनिधी या पैकी कोणीही ढुंकून पाहिले नाही. त्यामुळे हा प्रकल्प केवळ नावाला असल्याची स्थिती आहे.
भुसावळ नगरपालिका ही जिल्हा आणि नाशिक विभागातील सर्वात मोठी व ‘अ’वर्ग नगरपालिका आहे. तिचा अर्थसंकल्पही १०० कोटींचा आहे, असे असताना त्याकाळी महाराष्ट्र शासनाने सूचविलेला घनकचरा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.
नव्याने प्रकल्पाची गरज
भुसावळ शहरातून निघणारा हजारो टन कचºयावर प्रक्रिया करुन त्यापासून उपयुक्त असे शेतीसाठीचे खत तयार करण्यासाठी हा घनकचरा प्रकल्प त्याकाळी आकारास येण्यासाठी सुरू करण्यात आला होता. आता त्याची स्थिती पूर्वीसारखीच आहे. त्यामुळे तो नव्याने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले प्रकल्पासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यासाठी सहा महिने लागतील. नवीन एजन्सी नेमावी लागेल. रस्त्यावरील व घराघरांमधील कचरा गोजोरे येथे नेवून त्या ठिकाणी सायंटिफिक ‘डंपिंग ग्राऊंड तयार करण्यात येईल, असे बी.टी.बाविस्कर यांनी सांगितले. तेथे आधीच उभारण्यात आलेल्या फलाटावर रोज एक या प्रमाणे कचºयाचे ४६ ढिग तयार केले जातील. त्यावर प्रक्रिया केली जाईल.
फवारणी केली जाईल. पहिल्या दिवशी तयार केलेल्या ढिगाचा कचरा कुजल्यानंतर तो सायंटिफिक जाळीने गाळल्यानंतर त्यातून खत तयार केले जाणार असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२४ प्रभाग भुसावळ शहरात २४ प्रभाग आहेत. पालिकेत ४८नगरसेवक आहेत. ४८ वॉर्ड आहेत.या सर्व वार्डातून जमा होणारा कचरा गोजोरे येथे नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा बंद पडलेला पालिकेचा घनकचरा प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्यावर विद्यमान प्रशासनाने तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
स्वच्छ महाराष्ट्र भुसावळ पालिका प्रशासन सध्या महाराष्टÑ शासनाचे स्वच्छ अभियान राबवित आहे.अभियानांतर्गत बंद पडलेला प्रकल्प सुरू केला तर शहराची स्वच्छतेकडे वाटचाल होईल.सध्या शहरातील कचरा महमार्गाच्या बाजुला फेकला जातो.
सहा महिन्याचा कालावधी घनकचरा प्रकल्प उभारुन कचºयाची विल्हेवाट लावणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. बंद पडलेला घन कचरा प्रकल्पाची नव्याने उभारणी होईल.त्यासाठी सहा महिने लागतील. नवीन एजन्सी त्यासाठी नेमण्यात येईल.घराघरातील व रस्त्यावरील कचरा वाहून नेऊन गोजोरे येथे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी सायंटिफिक डंपींग ग्राऊंड तयार करण्यात येईल.
मुंबईच्या मक्तेदाराकडे होती जबाबदारी
४साधारण २००८ मध्ये भुसावळ पालिकेने गोजोरे येथे घन कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे पाच हेक्टर जागा खरेदी केली होती. त्यावर हा प्रकल्प उभारण्यासाठी बांधकामदेखील करण्यात आले आहे, मात्र पुढे गती मिळाली नाही, असे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले.
कुठेही कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी
४सध्या भुसावळ शहरातून गोळा होणारा कचरा महामार्ग आणि शहराच्या बाहेर कुठेही टाकला जातो. कचरा टाकण्यासाठी निश्चित अशा डंपिंग ग्राऊंडची व्यवस्था नाही. त्यामुळे कधी खेडी रोडवर. कधी वांजोळा रोडवर तर उड्डाण पुला लगत महामार्गाच्या बाजला कचरा टाकला जातो. त्याचा लोकांना त्रास होतो.
काम पूर्ण झालेच नसल्याने नुकसान
४गोजोरे येथे घनकचरा उभारण्याचे काम मुंबईच्या मक्तेदाराला दिले. त्याने सुरुवातीला काही काम केले. नंतर ते बंद पडले. त्याकडे तेव्हा लक्ष देण्यात आले नाही. आता हा प्रकल्प सुरू करण्यासाठी विचार केला जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी दिली.