कापूस 5600 रुपये क्विंटल

By admin | Published: January 9, 2017 12:20 AM2017-01-09T00:20:24+5:302017-01-09T00:20:24+5:30

कापूस पुरवठय़ातील मोठी घट यामुळे जळगाव जिल्ह्यात कापसाचे दर मागील पंधरवडय़ात 5100 रुपयांवरून 5600 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

Cotton 5600 quintals | कापूस 5600 रुपये क्विंटल

कापूस 5600 रुपये क्विंटल

Next


जळगाव : चीन, बांगलादेश व पाकिस्तानकडून कापूस गाठींना वाढलेली मागणी व देशातील कापूस पुरवठय़ातील मोठी घट यामुळे जळगाव जिल्ह्यात कापसाचे दर मागील पंधरवडय़ात 5100 रुपयांवरून 5600 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. हे या हंगामातील आतार्पयतचे सर्वाधिक दर आहेत. कापसाबाबत खुली आयात व निर्यात धोरण कायम असल्याने देशातून आतार्पयत 22 लाख गाठींची निर्यात झाली असून, त्यात महाराष्ट्राचा वाटा आठ लाख गाठींचा असल्याची माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने जारी केली आहे.
देशात यंदा 15 टक्क्यांनी कापूस लागवड घटली. त्यात अतिपावसाने गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक येथील कापसाचे पीक खराब झाले. फक्त महाराष्ट्र, राजस्थान व पंजाबमध्ये पीक बरे आहे. मागील वर्षी डिसेंबरअखेरीस एक कोटी 30 लाख गाठींची निर्मिती झाली होती. पण यंदा जिनींगना कापसाचा पुरवठा कमी झाला असून, अद्याप फक्त 94 लाख गाठींची निर्मिती झाली आहे.
डॉलर मजबुतीचाही परिणाम
नोटाबंदी व इंधनाच्या दरातील वाढीने डॉलर मजबूत झाला. रुपया कमकुवत झाल्याने परकीय खरेदीदारांना भारतीय कापूस खरेदी लाभ देणारी ठरत असल्याची माहिती मिळाली. देशातून चीन, पाकिस्तान, व्हीएतनाम, बांगलादेश, इंडोनेशिया येथे कापूस निर्यात सुरू आहे. 22 लाख गाठींची निर्यात झाली असून, यंदा फक्त 50 लाख गाठींची निर्यात होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Cotton 5600 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.