जळगाव जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर कापसाची लागवड

By admin | Published: June 14, 2017 05:22 PM2017-06-14T17:22:18+5:302017-06-14T17:22:18+5:30

कोरडवाहू कापसाची लागवड मात्र थांबली आहे

Cotton is cultivated on 40 thousand hectare in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर कापसाची लागवड

जळगाव जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर कापसाची लागवड

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 - जिल्हाभरात आतार्पयत विविध खरीप पिकांची 52 हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यात एकटय़ा कापसाची 40 हजार हेक्टरवर लागवड झाली असून, या क्षेत्रात पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाचे क्षेत्र 35 हजार हेक्टर एवढे आहे. कोरडवाहू कापसाची लागवड मात्र थांबली आहे.
मान्सूनपूर्व पाऊस सर्वत्र बरसला. परंतु मागील दोन दिवसांपासून पाऊस नाही. काही भागात तुरळक पाऊस सुरू आहे. जिल्हाभर मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर मशागतीची कामे गतीने झाली. परंतु नंतर पावसाबाबत अनुकूल स्थिती नसल्याने पेरण्या थांबल्या. तापीकाठावरील काही भागामध्ये पेरण्या झाल्या. या भागाचा अपवाद वगळता इतरत्र पेरण्या झालेल्या नाहीत.
कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य यांची पेरणी किंवा लागवड थांबली आहे. सोयाबीन, तूर या पिकांना उगवणीसाठी 40 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची गरज असते. पण एवढा पाऊस मागील दोन दिवसात नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत. शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पेरणीसाठी 40 मि.मी. पावसाची गरज असते. एवढा पाऊस मागील आठवडय़ात काही तालुक्यांमध्ये झाला. नंतर मात्र पाऊस नाही. सद्य:स्थितीत पेरणी टाळावी. आणखी पाऊस बरसल्यानंतर पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्हाभरात 52 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या असल्या तरी त्यात एकटय़ा कापसाचे क्षेत्र 40 हजार हेक्टर आहे. उर्वरित 12 हजार हेक्टरवर सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद मूग या पिकांची पेरणी झाली आहे.
35 हजार हेक्टरवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड झाली आहे. कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेले शेतकरी कापूस लागवड करीत आहेत. कापसाची लागवड सुरूच आहे. पण कोरडवाहू शेतक:यांनी मात्र कापसाची लागवड सुरू केलेली नसल्याचे चित्र आहे. कोरडवाहू कापसाची लागवड मागील अठवडय़ात काही भागात झाली. त्याची आकडेवारी पाच हजार हेक्टर्पयत असल्याचा अंदाज आहे.

Web Title: Cotton is cultivated on 40 thousand hectare in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.