कपाशी लागवड,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:52+5:302021-06-05T04:12:52+5:30
जामनेर : यंदा कपाशी लागवडीसाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांनी थोडी सावध भूमिका घेतली आहे. सुरुवातीच्या दोन-तीन वेचण्या झाल्यानंतर शेतातील कापसाचे ...
जामनेर : यंदा कपाशी लागवडीसाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांनी थोडी सावध भूमिका घेतली आहे. सुरुवातीच्या दोन-तीन वेचण्या झाल्यानंतर शेतातील कापसाचे पीक उपटून त्या जागी रब्बी हंगामात गहू, हरभरा किंवा मका पीक घेण्याचे नियोजन विशेषतः पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी केले आहे.
कोरोनामुळे काम नसल्याने
चोरट्यांची नजर पशुधनाकडे
कजगाव, ता. भडगाव : कोरोनामुळे काम नसल्याने चोरट्यांनी आता आपली नजर घरांसह पशुधनाकडे वळविली आहे. कजगाव येथे चोवीस तासात तीन मोटारसायकली व चार गायी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. यामुळे पोलिसांपुढे मोठेचे आव्हान उभे राहिले आहे.
एरंडोलसाठी चार कोटी
रुपये मंजूर
एरंडोल : आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे एरंडोल नगर परिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विविध विकासकामांकरिता चार कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, अशी माहिती आमदारांनी दिली.