कोरोनाला दूर सारून कापूस उद्योगाने टाकली कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:45+5:302021-09-27T04:17:45+5:30
हजारो हातांना रोजगार देणाऱ्या कापूस उद्योगावर तालुक्याची भिस्त असून कापसाच्या उद्योगाच्या तालुक्यात अकरा जिनिंग आणि प्रेसिंग आहेत. याशिवाय तालुक्यात ...
हजारो हातांना रोजगार देणाऱ्या कापूस उद्योगावर तालुक्याची भिस्त असून कापसाच्या उद्योगाच्या तालुक्यात अकरा जिनिंग आणि प्रेसिंग आहेत. याशिवाय तालुक्यात जिल्ह्यातील एकमेव ४८ रेचे असलेली जिनिंग आहे, तर शिवाय वर्षातील आठ महिने कापूस व हातांना काम देणाऱ्या या जिनिंग उद्योगाला कोरोना काळात फार मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले.
मजूर वर्गाला लॉकडाऊन काळात अन्नधान्याची मदत, सोशल डिस्टन्सिंग, त्याच प्रमाणे त्यांच्या राहण्याची व्यवस्था ह्या सर्व सुविधा तालुक्यातील कापूस उद्योजकांनी आर्थिक भुर्दंड केल्याने मजूर वर्गही आहे त्या ठिकाणी राहिला. यामुळे कोरोना काळ संपल्यानंतर उद्योगाची घडी बसवण्यासाठी जिनिंग चालकांना जादा त्रास झाला नाही. आज त्यामुळेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही तालुक्यातील जिनिंग उद्योगाची धडधड कायम सुरू आहे.
हजारो हातांना जिनिंग उद्योगाने काम दिले आहे. अनेकांना या जिनिंगवर पोटपाणी सुरू आहे, तर कापसाच्या तयार होणाऱ्या गाठाणीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कापसाला मागणी असून बोदवड तालुक्यातील कापसाच्या गाठाणी या जाकर्ता, इंडोनेशिया, बांगलादेश यात मोठी मागणी आहे. जिनिंगची धडधड कायम सुरू आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून कापूस आयात केला जातो, आज घडीला तालुक्यात कापसाच्या अकरा जिनिंग आहे.
त्यात सात ठिकाणी स्वतःची प्रेसिंग आहे, त्याच प्रमाणे कापसाच्या उद्योगाशी निगडित तेल, ढेप, सरकी हे प्रक्रिया करणारे उद्योग तालुक्यात सुरू आहेत. कोरोनाच्या संकट काळात या उद्योगाने कात टाकली आहे.