शेंदुर्णीत केळीऐवजी कापसाचे क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:51 AM2020-02-24T00:51:39+5:302020-02-24T00:53:04+5:30
केळीसारखेच कापसाचे नगदी पीक याकडे शेतकऱ्यांचा व व्यापाºयांचा ग्रामीण भागातील आर्थिक कणा कापूस बनला.
दीपक जाधव ।
शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : ब्रिटिश काळापासून धावणारी पाचोरा-जामनेर पीजी रेल्वे व अलीकडील काही वर्षात भरभराटीस आलेल्या जिनिंग-प्रेसिंग व्यवसायामुळे नावलौकिक वाढलेल्या शेंदुर्णीचा आणि केळीचा कोणताही अर्थाअर्थी संबंध नाही. पर्जन्याचे प्रमाण मागील वर्ष वगळता यापूर्वी घटल्याने व भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने गेल्या दशकात परिसरातील शेतकऱ्यांची केळीऐवजी कापसाची लागवड सुरू केली आहे. केळीसारखेच कापसाचे नगदी पीक याकडे शेतकऱ्यांचा व व्यापाºयांचा ग्रामीण भागातील आर्थिक कणा कापूस बनला.
मागील वर्षी दुष्काळ असल्याने सीसीआयची कापूस खरेदी साधारण १० ते १५ हजार क्विंटलपर्यंत इतकीच होती. परंतु यावर्षी आतापर्यंत ७० हजार क्विंटल खरेदी झाली आहे. या माध्यमातून ३५ ते ४० कोटींची आर्थिक उलाढाल झाली.
२९ फेब्रुवारीपर्यंत सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू असून शेतकºयांनी आपला असलेला कापूस लवकरात लवकर आणावा. सीसीआय केंद्र कापूस खरेदी शेतकºयांच्या घरातील शेवटपर्यंत कापसाचे बोंड असेपर्यंत खरेदी करावी अन्यथा व्यापारी हाच कापूस चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल खरेदी करतील व शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होईल. शेतकºयांसह व्यापारपेठेचा आर्थिक कणा बनला. परंतु आजच्या आठ वर्षांपूर्वी शेंदुर्णी एकूण आठ जिनिंग-प्रेसिंगच्या माध्यमातून चार ते पाच हजार मजुरांच्या हाताला काम होते. परंतु उर्वरित जिनिंग प्रेसिंग बंद असल्याने मजुरांना मिळणारा रोजगार मात्र बंद झालेला आहे.
यंदा ७० हजार क्विंटल कापूस खरेदी
शेंदुर्णी येथे फक्त सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू असल्याने खासगी जिनिंग प्रेसिंग गोपाल अॅग्रो इंडस्ट्रीज पहूर येथील बालाजी जिनिंग प्रेसिंग येथेच खरेदी करून जिनिंग प्रेसिंग प्रक्रिया केली जाते. शेंदुर्णी येथे जवळपास ७० हजार क्विंटल खरेदी करण्यात आले.