शिवणीत फवारणीने जळाली तीन एकरावर कपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 07:37 PM2020-08-31T19:37:26+5:302020-08-31T19:37:32+5:30

किटकनाशकाचा प्रताप: अळीचा नव्हे तर पिकाचाच केला बंदोबस्त

Cotton on three acres burnt by spraying in the seam | शिवणीत फवारणीने जळाली तीन एकरावर कपाशी

शिवणीत फवारणीने जळाली तीन एकरावर कपाशी

Next


खेडगाव,ता. भडगाव : शिवणी येथील धर्मसिंग भिमसिंग पाटील या शेतकऱ्याची तीन-साडेतीन एकरावरील कपाशी किटकनाशकाच्या फवारणीने जळाली (अकस्मात पान सुकणे) आहे.ऐन हातातोंडाशी आलेल्या कपाशीच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.सदर कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयाने केली आहे.
मागील आठवड्यात पावसाने उघडीप देताच या शेतकºयाने गावातीलच कृषिकेंद्रातून एका कंपनीचे डायफेनथ्युराँन व प्रोफेनस अन्सायपर या किटकनाशकांची फवारणी केली. हे किटकनाशक कपाशीवर येणारी रसशोषण करणारी कीड व अळींचे अंडे, अळी यांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरतात.मात्र झाले उलटेच फवारणीनंतर कपाशीचे पानेच जळाल्यासारखी करपुन गेली.अडीच-तीन महीन्याचे जोमदार कपाशीचे क्षेत्र भकास झाले.आज प्रत्येक कपाशीच्या झाडावरील पहीला बहारच्या कै-या पक्व झाल्या आहेत. किटकनाशकाच्या परिणामाने ती फुटतील की नाही ही शंकाच आहे. तर वरचा दुसºया बहारातील फुलफुगडी जमीनीवर आली आहे.यामुळे उत्पन्न बुडाले आहे.
सदर शेतकºयाने तक्रार केल्यानंतर सोमवारी पहाटे त्या किटकनाशक कंपनीचे डीलर, कंपनी प्रतिनिधी यांनी या क्षेत्राची पहाणी केली.किटकनाशक नमुना तपासणीसाठी कंपनीकडे पाठविला आहे. दरम्यान आपण आजच पं.स. व तालुका कृषिअधिकाºयाकडे लेखी तक्रार करुन पंचनाम्याची व सदर किटकनाशक कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे सांगीतले .

 

Web Title: Cotton on three acres burnt by spraying in the seam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.