तीन वेगवेगळ्या शहरांमधून नगरसेवकांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:08+5:302021-03-19T04:16:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महापालिकेतील यंदाची महापौर व उपमहापौर पदांची निवडणूक जितकी चर्चेची ठरली, तितकीच ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्णही ...

Councilors from three different cities voted | तीन वेगवेगळ्या शहरांमधून नगरसेवकांनी केले मतदान

तीन वेगवेगळ्या शहरांमधून नगरसेवकांनी केले मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - महापालिकेतील यंदाची महापौर व उपमहापौर पदांची निवडणूक जितकी चर्चेची ठरली, तितकीच ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्णही ठरली आहे. स्पष्ट बहुमत असतानाही भाजपमधील फूट व केवळ १५ नगरसेवक असतानाही शिवसेनेची सत्ता आल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. त्यात महापालिकेच्या इतिहासात महापौर व उपमहापौर पदांची निवडणूक ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यात शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी राज्यातील तीन शहरांमध्ये थांबून या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. आधुनिक काळातील बदलत्या राजकारणाची ही निवडणूक विशेष ठरली.

शिवसेनेने भाजपचे काही नगरसेवक फोडल्यानंतर सर्व नगरसेवक ठाणे येथील बाईक रिसॉर्ट या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून ठाण मांडून होते; तर आणखी काही नगरसेवकांची फूट होऊ नये म्हणून सत्ताधारी भाजपने आपल्या नगरसेवकांना नाशिक येथील अज्ञातस्थळी हलवले होते; तर शिवसेना व भाजपचे काही नगरसेवक जळगाव शहरातच थांबून होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी, अशा सूचना राज्य शासनाने दिल्यामुळे नगरसेवक आहेत त्याच ठिकाणावरून ऑनलाईन नाव सभेत सहभागी झाले.

वेगवेगळ्या शहरांमधील तीन ठिकाणी ठरले घडामोडीचे केंद्र

भाजपमधील फुटलेले नगरसेवक ठाणे येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या देखरेखीखाली ठाण्यातील बाईक रिसॉर्टमध्ये थांबले होते. महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व सूत्रे याच रिसॉर्टमधून हलली. तसेच या निवडणुकीत सर्व नगरसेवकांनीही याच रिसॉर्टमध्ये उपस्थित राहून मतदान केले आहे. भाजपचे काही नाशिक येथील एका हॉटेलमध्ये थांबून या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला; तर जळगाव शहरातील माजी मंत्री गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय असलेल्या जी. एम. फाउंडेशनमधून भाजपची सर्व सूत्रे हलली. निवडणुकीदरम्यान नगरसेवकांना वेळोवेळी आक्षेप घेण्याबाबतही डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी हे पदाधिकारी याच ठिकाणावरून नगरसेवकांना सूचना देत होते. एकूणच काय, तर ही निवडणूक ऐतिहासिकसह आधुनिकदेखील ठरली.

Web Title: Councilors from three different cities voted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.