१४४ जागांसाठी आयटीआयची समुपदेशन फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:17+5:302021-01-08T04:49:17+5:30

जळगाव : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची दुसऱ्या समुपदेशन फेरीला सुरुवात झाली आहे. १४४ जागांसाठी ही फेरी राबविण्यात ...

Counseling round of ITI for 144 seats | १४४ जागांसाठी आयटीआयची समुपदेशन फेरी

१४४ जागांसाठी आयटीआयची समुपदेशन फेरी

Next

जळगाव : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची दुसऱ्या समुपदेशन फेरीला सुरुवात झाली आहे. १४४ जागांसाठी ही फेरी राबविण्यात येत आहे. यासाठी बुधवारी सकाळी ७ वाजेपासून विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

शासकीय आयटीआयमधील ९१२ जागांच्या प्रवेशाठीची प्रक्रिया १ ऑगस्टपासून प्रारंभ झाली होती. ९ सप्टेंबर रोजी प्रथम फेरीला सुरुवात होऊन ती १६ सप्टेंबर रोजी संपली. मात्र, त्यानंतर मराठा आरक्षणामुळे दोन महिने ही प्रक्रिया रखडली गेली. त्यानंतर पुन्हा डिसेंबर महिन्यात या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून, ७६८ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. आता उर्वरित १४४ जागांसाठी समुपदेश फेरी राबविली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नवीन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. हव्या त्या आयटीआय निवडचीही संधी देण्यात आली होती.

सकाळपासून विद्यार्थी ठाण मांडून

नुकतीच समुपदेश फेरीची यादी जाहीर झाले आहे. त्यामुळे ३६४ विद्यार्थ्यांचे नावे आहेत. या विद्यार्थ्यांना बुधवारी १ ते १००, १०१ ते २०० तसेच २०० ते ३०० व ३०० ते ३६४ या क्रमाने आयटीआयत प्रवेशासाठी बोलविण्यात येत होते. ही समुपदेश फेरी १४४ जागांसाठी राबविली जात आहे. ३६४ विद्यार्थ्यांमधून १४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आपला क्रमांक लागावा म्हणून सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गर्दी केली होती.

Web Title: Counseling round of ITI for 144 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.