जीएमसीत दुरूस्तीसाठी मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:55+5:302021-02-06T04:27:55+5:30
महिनाभर जनजागृती जळगाव : जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे ४ फेब्रवारी ते 4 ...
महिनाभर जनजागृती
जळगाव : जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे ४ फेब्रवारी ते 4 मार्च या महिनाभरात जिल्ह्यात कर्करोग जनजागृति अभियान व तंबाखू मुक्त कार्यलय अभियान राबविणार आहे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते शुभारंभ झाला. जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिति सदस्य व जन मानवता बहुउद्देश्यीय संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगरजिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ नितिन भारती उपस्थित होते.
भुसावळात ३० रुग्ण
जळगाव : कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये भुसावळ दुसऱ्या क्रमांकावर असून जळगाव शहरात १५१ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ भुसावळात सध्या ३० सक्रीय रुग्ण आहेत. या नंतर चोपडा तालुक्यात कोरोनाचे २३ रुग्ण उपचार घेत आहेत. बहुतांश तालुक्यात दहा पेक्षा कमी रुग्ण आहेत.
जि. प. त बैठक
जळगाव: जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांकडून कामाचा आढावा घेतला. गुरूवारी दुपारी साडे तीन वाजेपासून त्यांच्या कार्यलयात ही बैठक झाली. प्रशासकीय मान्यता, एकत्रित नियोजन याचाही आढावा घेतला जात आहे.