तोंडापूर येथील देशी दारु दुकानाचा ठराव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:39 PM2017-12-23T16:39:55+5:302017-12-23T16:47:23+5:30

जिल्हापरिषद सर्वसाधारण सभेत झाला निर्णय

The country's ammunition store in tondapur, canceled the resolution | तोंडापूर येथील देशी दारु दुकानाचा ठराव रद्द

तोंडापूर येथील देशी दारु दुकानाचा ठराव रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देबहुमताच्या आधारे केला होता ठरावग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केला होता विरोधजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला ठराव रद्द

आॅनलाईन लोकमत
तोंडापूर, ता.जामनेर,दि.२३ : तोंडापूर ग्रामपंचायतीने गावाच्या बाहेर देशी दारूचे दुकान सुरु करण्यासंदर्भात मासिक सभेत ठराव मंजूर केला होता. त्याला ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी विरोध केल्याने अखेर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव रद्द करण्यात आला.
तोंडापूर ग्रामपंचायतीने २९ एप्रिल २०१७ रोजी मासिक सभेमध्ये गावाच्या बाहेर देशी दारु दुकान सुरू करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला होता. औरंगाबाद येथील एका महिलेच्या नावाने असलेला हा परवाना जळगवातील आशा बाबा नगर येथे सुरु आहे. मात्र हे देशी दारु दुकान तोंडापूर येथे स्थलांतरित करण्यासाठी ग्रामपंचायतीने नाहरकत ठराव केला होता. मात्र महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५७ चे कलम १४२ नुसार सदरील ठराव रद्द करण्यात येत असून त्यास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सुचक सरोजिनी संजय गरुड व अनुमोदक कैलास विठ्ठल सरोदे यांनी दिल्याचे म्हटले आहे. ठराव बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य अविनाश ठाकूर, नाना जाधव, चैताली पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती . तसेच गावकºयांनी व महिलांनी ग्रामसभेत विरोध केला होता. याबाबत महिलांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह पोलिसांकडे निवेदन दिले होते. तक्रारींची दाखल घेत देशी दारु दुकानाचा ठराव रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: The country's ammunition store in tondapur, canceled the resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.