रात्री दहा वाजता उघडले कोर्टाचे दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:52 PM2019-11-17T12:52:19+5:302019-11-17T12:53:09+5:30
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादीत केलेल्या जमीनीचा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न देण्याबाबतच्या प्रकरणात न्यायालयाने बांधकाम विभागाचे ...
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादीत केलेल्या जमीनीचा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न देण्याबाबतच्या प्रकरणात न्यायालयाने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास ब्रिजलाल पाटील (४५, रा.जळगाव) यांना बुधवारी दुपारी अटक (दिवाणी कैद) केली आणि परत त्याच रात्री दहा वाजता त्यांच्या या अटकेला स्थगितीही दिली.
दरम्यान, भूसंपादनाच्या प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना अटक व स्थगितीसाठी रात्री १० वाजता कोर्टात कामकाज होण्याची ही पहिलीच वेळ होती. अभियंता पाटील यांनी लागलीच दुसºया दिवशी मिळकतीचे उतारे, बॅँक स्टेटमेंट व प्रतिज्ञापत्र सादर केले. दरम्यान, मोबदल्याच्या रकमेबाबत बांधकाम विभागाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या नावाने दिलेले १ कोटी ७५ लाख रुपयांचे धनादेश जप्त केलेले आहेत. त्यानंतरही संबधित अधिकाऱ्यांनी न्यायालयात पैसे भरले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कैदी वॉरंट बजावण्यात येवून बुधवारी न्यायालयाचे बेलीफ यांनी पाटील यांना अटक केली होती.
काय आहे प्रकरण
तालुक्यातील म्हसावद येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी जमीन भुसंपादनाची अधिसूचना ३० एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली होती. यानंतर संपादीत केलेल्या जमीनीचा निवाडा ३१ डिसेंबर २०१२ रोजी घोषित झाला. शेतकरी भूषण दत्तात्रय चिंचोरे, रामराव नाटू पाटील, शकुंतला सुरेश पोरवाल व सुरेश पुंडलीक पाटील या शेतकºयांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी भूसंपादन कायदा कलम १८ प्रमाणे न्यायालयात खटला (रेफरन्स) दाखल केला होता. ६ मार्च २०१९ रोजी न्यायालयाने निकाल देतांना शेतकºयांना वाढीव मोबदला मंजूर केला आहे. परंतु, बांधकाम विभागाने वाढीव मोबदला दिला.