न्यायालयातील चोरी प्रकरण भोवले; जळगावात चार पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 10:00 PM2019-08-26T22:00:00+5:302019-08-26T22:00:24+5:30
या घटनेची चौकशी झाली होती. त्यात ड्युटीवर असलेल्या चार कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले होते.
जळगाव : जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेली चोरी तेथे ड्युटीला असलेल्या चार पोलिसांना चांगलीच भोवली आहे. या प्रकरणी हवालदार राजेंद्र भिका चव्हाण, कॉ.प्रवीण शंकर वाघ, राजेंद्र प्रताप दोडे व राहूल अरुण पारधी या चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोमवारी ही कारवाई केली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांच्या कार्यालयात ३ ऑगस्टच्या रात्री चोरट्यांनी रोख रक्कम हाती न लागल्याने बाथरुममधील नळ चोरुन नेले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या घटनेची चौकशी झाली होती. त्यात ड्युटीवर असलेल्या चार कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले होते.