घराच्या वाटणीवरून चुलत बंधूंनीच केला घात

By admin | Published: January 30, 2017 01:17 AM2017-01-30T01:17:56+5:302017-01-30T01:17:56+5:30

गोकूळ माळी जळीत प्रकरण : जिवंत जाळून खून करणारे सहा अटकेत

The cousins ​​did the same from the house distribution | घराच्या वाटणीवरून चुलत बंधूंनीच केला घात

घराच्या वाटणीवरून चुलत बंधूंनीच केला घात

Next

साक्री :  घराच्या  वाटणीवरून झालेल्या वादातून पाटबंधारे विभागाचे कर्मचारी गोकूळ माळी यांची शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्याच चारचाकी वाहनात निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.   याप्रकरणी  पोलिसांनी  सहा संशयितांना नंदुरबार येथून ताब्यात घेतले आहे.

 गोकूळ रतन माळी (57, रा. जैताणे, ता. साक्री) हे साक्री येथील पाटंबधारे विभागात चालक म्हणून कार्यरत होते. त्यांचे वाहन (एमएच 15-एआर 9999) पाटबंधारे कार्यालयाजवळ उभे केलेले होते. रात्रीच्या सुमारास ही कार पेटल्याचे पाहून साक्री पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.  आग विझविल्यानंतर गाडीमध्ये चालक सीटवर गोकूळ माळी  यांचा जळून कोळसा झाला होता. या वेळी माळी यांच्या तोंडात कापसाचा बोळा व गळ्याला दोरी आवळण्यात आली होती. पायही बांधून ठेवण्यात आले होते.
यासंदर्भात साक्री पोलिसांनी रात्री नंदुरबार येथील माळीवाडय़ातून सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याविरोधात 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सहापैकी केवळ पाच आरोपींची नावे रेकॉर्डवर असून उर्वरित एकाला केवळ चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात ठेवले आहे.

नातेवाइकांचेच क्रूर कृत्य
या घटनेची माहिती गोकूळ यांचा मुलगा धनंजय माळी याला देण्यात आली. तेव्हा त्याने  त्यांचे चुलत भाऊ कृष्णा गजमल माळी, प्रल्हाद कृ ष्णा माळी, विजय कृष्णा माळी, काशीराम गजमल माळी, तुकाराम काशीराम माळी यांनी घराच्या वाटणीवरून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The cousins ​​did the same from the house distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.