कोव्हीड केअर सेंटरमुळे रावेरमधील सर्व्हेक्षण रेंगाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 02:39 PM2020-05-11T14:39:37+5:302020-05-11T14:40:11+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व रावेरकरांचा रस्त्यावर अनावश्यकरित्या वाढलेला वावर पाहता सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे.

 The Coveid Care Center delayed the survey in Raver | कोव्हीड केअर सेंटरमुळे रावेरमधील सर्व्हेक्षण रेंगाळले

कोव्हीड केअर सेंटरमुळे रावेरमधील सर्व्हेक्षण रेंगाळले

Next

किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : ग्रामीण रुग्णालयात मंजूर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, शिपाई, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई आदी पदे रिक्त असताना कोव्हीड केअर सेंटर कार्यान्वित झाल्याने अपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांची विभागणी झाली आहे. परिणामी शहरातील घरोघरी जाऊन कोरोनाच्या संशयित रुग्ण आहेत का? यासंबंधी सुरू असलेली सर्व्हेक्षण मोहीम रेंगाळली आहे. लगतच्या बºहाणपूर व भुसावळ येथील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व रावेरकरांचा रस्त्यावर अनावश्यकरित्या वाढलेला वावर पाहता सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा सहाय्यक व शिपाई यातील बहूतांशी पदे रिक्त असल्याने आरोग्य कर्मचाºयांचा फौजफाटा पुरेसा नाही. त्यातही ९५० खाटांचे कोव्हीड केअर सेंटर व तीन कोव्हीड आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्याने तुटपुंज्या आरोग्य कर्मचाºयांची विभागणी झाली आहे.
परिणामत: शहरातील घराघरात जावून कोरोनाची प्रथमदर्शनी लक्षणे असलेल्या संशयित व्यक्ती आहेत का? वृध्द किती? रक्तदाव वा मधुमेह असलेले वृध्द किती? घरात पूर्वीपासून किती सदस्य आहेत? आता नव्याने काही दाखल झाले आहेत काय? यासंबंधीचे आरोग्य कर्मचारीं व अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली सर्व्हेक्षण मोहीम रेंगाळली आहे.
तालुक्याच्या सीमेपासून १२ कि.मी. अंतरावरील बºहाणपूर शहरात कोरोनाचे ४ रूग्ण दगावल्याने व ३९ रूग्ण कोरोनाने बाधित झाले. तसेच लगतच्या भुसावळ येथेही कोरोनाचे रूग्ण आढळले. यामुळे रावेर शहरासह ग्रामीण भागात आरोग्य विभागाची ही धडक मोहीम गतिमान करण्याची गरज आहे. संशयितांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. अन्यथा ना.. ना... करते... करते... अचानक कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य कर्मचाºयांद्वारे एकाच वेळी सदरची मोहीम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रावेर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाºयांची नियमित ग्रामीण रूग्णालयात व कोव्हीड केअर सेंटरमध्ये विभागणी झाली आहे. यामुळे शहरातील सर्व्हेक्षण मोहिमेवर अंशत: परिणाम झाला आहे किंबहुना अंगणवाडी सेविकांद्वारे सदरचे सर्व्हेक्षण सुरू आहे.
- डॉ.एन.डी.महाजन, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय, रावेर

Web Title:  The Coveid Care Center delayed the survey in Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.