चोपडा रोटरी क्लबतर्फे कोविड लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:05+5:302021-09-26T04:18:05+5:30
लसीकरण मोहिमेचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते ...
लसीकरण मोहिमेचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रदीप लासुरकर म्हणाले की, संपूर्ण तालुक्यात कोविड-१९ लसीकरण मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व त्यांच्या कक्षात येणाऱ्या सर्वच गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे व लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिका रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत बारेला म्हणाले की, आतापर्यंत आम्ही भरपूर ठिकाणी लसीकरण मोहीम राबविली. प्रत्येक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गोंधळ झालाच आहे. पण रोटरी क्लब चोपडाने जे नियोजन केले आहे, ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. त्यात प्रथम रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन तसेच पहिला डोस व दुसरा डोससाठी स्वतंत्र रांगा, रांगेतील व्यक्तींमधील सामाजिक अंतर, प्रत्येकास १०० टक्के मास्क, हजारो लोकांची उपस्थिती तरीही अतिशय नियोजन व शांततापूर्ण वातावरणात कोविड लसीकरण झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले व पुढील लसीकरण मोहीमसुद्धा पंकज विद्यालयात घ्यावे, असा त्यांनी मानस व्यक्त केला.
येणाऱ्या लाभार्थ्यांना मदतीसाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या. आधारकार्डवर बेनिफिशीयरी आयडी, रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर लिहिणे इत्यादी बाबींसाठी रोटरी क्लबतर्फे सभासदांनी मदत केली जात होती. मोहीम यशस्वितेसाठी रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले, मानद सचिव रोटे प्रवीण मिस्त्री, प्रोजेक्ट चेअरमन नितीन अहिरराव, को-प्रोजेक्ट चेअरमन रूपेश पाटील, आरोग्य सहायक जगदीश बाविस्कर यांसह रोटरीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
250921\img-20210924-wa0048.jpg
लसीकरण सुरू असताना