बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:17 PM2020-09-29T23:17:01+5:302020-09-29T23:17:09+5:30
नागादेवी गावठाण मधील घटना
यावल : दहिगाव येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नागादेवी गावठाणमध्ये सातपुड्यातून परत येणाऱ्या गायीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. नागादेवी गावठाणातील ही घटना दुसऱ्यांदा घडल्याने शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
येथील लीलाबाई बारेला या गरीब आदिवासी महिलेची गाय सातपुड्यात चरावयास गेली होती दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पाच वाजता परतीच्या मार्गावर नागादेवी गावठाण लगतच असलेल्या नर्सरीनजीक बिबट्याने गायीवर हल्ला केला व तिला जागीच ठार केले.
ही गाय २५ ते ३० हजार रुपये किमतीची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिला गरीब व शिक्षीत नसल्याने तिने वनविभागाकडे कुठलीही तक्रार केली नाही. गेल्या आठवड्यात नागादेवी गावठाण लगतच असलेल्या लसुन परळी येथील आदिवासींच्या गोठ्यात शिरूर बिबट्याने एका गाइला ठार केले त्या आदिवासी बांधवाने रीतसर वन विभागाकडे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे या आदिवासी महिलेला सुद्धा वनविभागाने पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.