चाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली - पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:22 PM2018-12-06T12:22:55+5:302018-12-06T12:23:20+5:30

दगडीसबगव्हान येथे केंद्रीय समितीकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

cow sold for a fodder | चाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली - पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी मांडल्या व्यथा

चाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली - पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी मांडल्या व्यथा

googlenewsNext

पारोळा, जि. जळगाव : या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना चारा नाही. थोडे पार पिक हाती आले असते पण बोण्ड अळीने तोंडचा घास पळविला आणि अशा परिस्थितीत सरकारकडून येणारी बोण्ड अळीची तुटपुंजी मदत तीही अद्याप मिळाली नाही. या मुळे कर्जाच्या ओझा खाली आलेला शेतकरी अर्धमेला झाला आहे, अशा व्यथा पारोळा तालुक्यातील शेतकºयांनी केंद्रीय समितीच्या पथकापुढे मांडल्या.
६ रोजी सकाळी ११ वाजता दगडी सबगव्हान ता. पारोळा या दुष्काळी गावाला केंद्रीय समितीच्या पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी.देशपांडे, सहसचिव छवी झा, डीपाटमेंट आॅफ पल्ससचे संचालक ए. के.तिवारी एमएनसीएफसीच्या सहायक संचालिका डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश होता. या सदस्यांनी या दगडी सबगव्हान गावाची दुष्काळी परिस्थितीची पाहणी करीत शेतकºयांशी संवाद साधला.
या गावातील बाळू नथा पाटील व नारायण श्रीराम पाटील या शेतकºयांच्या शेताची पाहणी केली. या वेळी नारायण पाटील यांना शेतात किती कापूस पिकला, त्याला खर्च किती आला, कापूस कुठे विकला, किती पैसे मिळाले असे प्रश्न केले. या वेळी हेक्टरी १ क्विंटल कापूस आल्याचे शेतकºयाने सांगितले.
या नंतर बाळू नथा पाटील यांना कापूसच पीक का घेता असे पथकाने विचारले असता विकासोचे घेतलेले कर्ज फेड फक्त कापूस उत्त्पन्न घेतल्यावर होते असे सांगितले. या वेळी शासनाने आम्हाला बी बियाणे, रासायनिक खते, यासाठी रोख रक्कम दिली पाहिजे असे सांगितले. तर सरपंच संगीता पाटील यांनी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या साठी उपाययोजना झाल्या पाहिजे अशी मागणी या पथकाकडे केली तर गावात रोहयो ची कामे सुरू झाली पाहिजे असे निवेदन दिले.
या वेळी शेतकºयांनी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरांच्या चाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, मजुरांना हाताला काम नाही, पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनाची कामे नाहीत, शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे, दुष्काळी स्थितीमुळे तो नैराश्याने ग्रस्त झाला आहे. मग या कर्जबाजारीपणाला कंटाळून तो आत्महत्याकडे वळतो, असे या गावातील माजी सरपंच काळू पाटील यांनी सांगितले
या पथका समवेत जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रांताधिकारी विजयनंद शर्मा, अमळनेर प्रांत अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, कृषी सहायक संचालक रमेश भताने, निवासी नायब तहसीलदार पंकज पाटील, गटविकास अधिकारी आर. के. गिरासे, कृषी अधिकारी एस.पी. तवर, विस्तार अधिकारी सुनील पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: cow sold for a fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.