बोदवडमध्ये गाय चोरीचे सत्र थांबेना, संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:21 AM2021-08-25T04:21:11+5:302021-08-25T04:21:11+5:30
बोदवड : शहरातील पशुधनावर चोरीचे मोठे संकट ओढवले असून दिवसागणिक पशुधन चोरीच्या घटना घडत आहे, पण तपास काही ...
बोदवड : शहरातील पशुधनावर चोरीचे मोठे संकट ओढवले असून दिवसागणिक पशुधन चोरीच्या घटना घडत आहे, पण तपास काही केल्या लागत नसल्याचे चित्र आहे. चारचाकी वाहनात घराबाहेर असलेल्या खुंट्यावरून गाय चोरीस गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
शहरातील उजनी रस्त्यावर गजानन महाराज मंदिराजवळ राहत असल्या मनूर गावच्या सरपंच लताबाई सुभाष देवकर यांच्या घरासमोर गोठ्यात बांधलेले गायी वासरूसह अज्ञात चोरट्याने चार चाकी वाहनातून चोरून नेले. ही चारचाकी सीसीटीव्हीमध्ये कैद असून याच गाडीतून शहरातील गायी चोरीस जात असल्याचे वृत्त आहे.
त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागात कारकून असलेले संजय पाटील यांच्या रेणुका नगरातील घराजवळून गोठ्यातून गाय चोरून नेली आहे. याबाबत त्यांनी तक्रारही दिली आहे.
शहरातून मोठ्या प्रमाणात गायी, जनावरे चोरीस जात आहे. त्यांचा तपास मात्र लागत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.