मुस्लीम तरुणाने केले गाईचे विधिवत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:49+5:302021-07-07T04:21:49+5:30
फैजपूर, ता. यावल : येथील गोभक्त तथा सामान्य कुटुंबातील मुस्लीम तरुण रशीद तडवी यांच्या गाईचे मंगळवारी अचानक ...

मुस्लीम तरुणाने केले गाईचे विधिवत अंत्यसंस्कार
फैजपूर, ता. यावल : येथील गोभक्त तथा सामान्य कुटुंबातील मुस्लीम तरुण रशीद तडवी यांच्या गाईचे मंगळवारी अचानक निधन झाले. यानंतर या तरुणाने गाईचे विधिवत अंत्यसंस्कार केले.
या गाईच्या निधनाने पूर्ण रशीद तडवी कुटुंब शोकाकुल झाले. या गाईचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील वेगवेगळ्या मंदिरात जाऊन ही गाय विसावा घेत होती. सायंकाळी गाय घरी न आल्यास कासावीस होऊन अनेक वेळा तडवी या गाईला शोधण्यासाठी संपूर्ण गावभर फिरत असत. ही गाय म्हणजे रशीदच्या कुटुंबातील एक सदस्य होती. या गाईच्या निधनामुळे त्यांना दुःख अनावर झाले. त्यांनी या गाईचे अंत्यसंस्कार खिरोदा रोडवरील जलशुद्धीकरण केंद्र पाठीमागे खड्डा खोदून विधिवत पूजन करून केले. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, प्रवीणदास महाराज, माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, संजय सराफ, प्रा. उमाकांत पाटील, लोकेश कोल्हे हजर होते. गाईच्या अंत्यसंस्काराप्रसंगी अचानक भर उन्हामध्ये पर्जन्यवृष्टी झाली. ही पर्जन्यवृष्टी अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत सुरू होती, हा अनुभव विशेष होता. यावेळी रशीदला अश्रू अनावर झाले. महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी त्यांचे सांत्वन करून रशीदला एक हजार रुपये देऊन आशीर्वाद दिला.