गुन्हा २००६ मध्ये ; अटकसत्र २०१२ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:46 PM2019-08-31T15:46:42+5:302019-08-31T15:47:33+5:30

घरकुल घोटाळ्याची फिर्याद २७ जानेवारी २००६ रोजी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली. तब्बल सहा वर्ष या गुन्ह्याचा तपास धिम्या ...

 In crime 1; In arresting 3 | गुन्हा २००६ मध्ये ; अटकसत्र २०१२ मध्ये

गुन्हा २००६ मध्ये ; अटकसत्र २०१२ मध्ये

Next

घरकुल घोटाळ्याची फिर्याद २७ जानेवारी २००६ रोजी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली. तब्बल सहा वर्ष या गुन्ह्याचा तपास धिम्या गतीनेच चालला. २०१२ मध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे एकनाथराव खडसे यांनी हे प्रकरण उचलून धरल्याने २०१२ मध्ये तपासाधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी २८ जानेवारी २०१२ रोजी उच्चाधिकारी समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे मेजर वाणी, राजा मयुर व मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना अटक केली. या चौघांची पहिली अटक होती. त्यानंतर अटकसत्र सुरु झाले. १० मार्च २०१२ रोजी आमदार सुरेशदादा जैन यांना धरणगाव रेल्वेगेटजवळ अटक करण्यात आली. त्यानंतर २१ मे २०१२ रोजी तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव देवकर पोलिसा हजर झाले होते. मंत्री व पालकमंत्री असतानाही तपाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या दालनात बोलावून चौकशी केली होती. त्यानंतर अटकेची कारवाई झाली होती. घरकुल प्रकरणामुळेच देवकरांना मंत्रीपद सोडावे लागले होते. या गुन्ह्यातील संशयित सुरेशदादा जैन व प्रदीप रायसोनी हे दोघंच जास्त काळ कारागृहात राहिले.

खडसेंनी केला होता पाठपुरावा
घरकुल घोटाळ्याची फिर्याद २७ जानेवारी २००६ रोजी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुरेशदादा जैन व एकनाथराव खडसे एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. खडसेंचे पूत्र निखील भाजप-सेना युतीचे उमेदवार होते, तर राष्टÑवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांचे पूत्र मनीष जैन हे खडसे पूत्राच्या विरोधात अपक्ष लढले होते. तेव्हा सुरेशदादा जैन यांनी युतीधर्म न पाळता अपक्ष जैन यांना निवडून आणले होते. त्यामुळे पूत्राचा पराभव खडसे यांच्या जिव्हारी लागल्याने तेव्हापासून खडसे व सुरेशदादा जैन यांच्यात दरी निर्माण झाली. त्याचा वचपा म्हणून खडसे यांनी घरकुल प्रकरण उचलून धरले आणि त्याच प्रकरणात सुरेशदादा जैन व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली होती.

घरकुलमुळे जैन, रायसोनीसंह अनेकांचे आयुष्य दावणीला
घरकुल प्रकरणामुळे अनेक राजकारण्यांचे आयुष्य दावणीला लागले. त्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन, तत्कालिन पाकिलेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे मेजर वाणी, राजा मयुर व मुख्याधिकारी पी.डी.काळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. आजी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांना अटक झालेली नसली तरी निकाल लागेपर्यंत घरकुलाचे भूत त्यांच्या मानगुटीवर होते.या प्रकरणामुळे सुरेशदादा जैन व रायसोनी यांची राजकीय कारकिर्दच धोक्यात आली तर देवकरांनाही मंत्री पद सोडावे लागले.
दोन आजी-माजी मंत्री व आमदारांचा समावेश
या गुन्ह्यात संशयिंत आरोपी म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश आहे. आमदार चंद्रकांत सोनवणे यांना या प्रकरणात अटक झालेली नव्हती. देवकर व जैन या दोन्ही माजी मंत्र्यांना अटक झाली होती.

पाच वर्ष धुळ्यात खटल्याचे कामकाज
न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप, साक्षदारांवर दबाव येवू नये म्हणून १७ डिसेंबर २०१४ रोजी हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जळगाव न्यायालयातून धुळे न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. पाच वर्ष धुळे न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर या जामीनाला त्रयस्त अर्जदारांनी खंडपीठात आव्हान दिले होते. न्या.नलावडे यांनी देवकरांचा जामीन रद्द केला होता. त्यामुळे देवकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हाही त्रयस्त अर्जदारांनी हरकत घेतल्याने हा खटला जळगावपासून नजीक असलेल्या जिल्ह्यात अर्थात धुळे येथे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

Web Title:  In crime 1; In arresting 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.