अमळनेर पालिकेच्या 17 जणांवर गुन्हा
By admin | Published: September 19, 2015 12:12 AM2015-09-19T00:12:54+5:302015-09-19T00:12:54+5:30
वृक्षतोड : नगरसेवकांसह कर्मचा:यांचा समावेश
अमळनेर : बनावट दस्तावेज तयार करून नगरपालिका आवारातील मालकीच्या मच्छिमार्केटमधील झाडे लिलावात विकून न्यासभंग केल्याप्रकरणी पालिकेच्या पदाधिका:यांसह 17 कर्मचा:यांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 60/1 व 108 मधील झाडे तोडणे व विक्रीबाबत 15 मे 2015 च्या टिपणी अहवालावर मुख्याधिकारी व अध्यक्षांच्या मंजुरीच्या सह्या न करता वृत्तपत्रातील जाहिरात प्रशासकीय अधिका:यांऐवजी वृक्ष प्राधिकरण समितीच्या अध्यक्षांनी प्रसिद्ध केली. लिलावाची जाहीर नोटीस वृत्तपत्राऐवजी साध्या कागदावर प्रसिद्ध केल्याची तक्रार आहे. तसेच कोणताही परवाना नसताना आझम सादिक मेवाती यांना झाडे विक्री केली. लिलाव खर्डावर लिलावात बोली बोलणा:यांची एकच स्वाक्षरी असून इतरांच्या स्वाक्ष:या नाहीत. प्रशासन अधिकारी संजय चौधरी, न.पा. कर्मचारी संजय पाटील, पाणीपुरवठा अभियंता श्याम करंजे आणि अध्यक्षांची सही असून मुख्याधिका:यांची सही नाही व करंजे यांच्या स्वाक्षरीखाली 1 जुलै 15 अशी तारीख नमूद केली. तसेच 29 जून रोजी प्रशासन अधिकारी निवडणूक कामात असताना त्यांच्या अनुपस्थित लिलाव करण्यात आला. नगरपालिकेच्या लाखो रुपयांच्या झाडांची रक्कम गैरमार्गाने चुकीचे दस्तावेज तयार करून शासकीय मालमत्ता त्यांच्या ताब्यात दिली असताना न्यासभंग केला व बनावटीकरण केले, अशी फिर्याद नगरसेविका नीता नीलेश भांडारकर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून भारती चौधरी, श्रीराम चौधरी, साहेबराव पवार, स्वाती पाठक, अनिल महाजन, सखुबाई भिल, संजय चौधरी, श्यामकुमार करंजे, संजय पाटील, आझम मेवाती, लाडका गुलाम हुसेन मेवाती, प्रल्हाद पाटील, हिंमत चौधरी, ईस्माईखॉ मेवाती, अजिम मेवाती, देवीदास चौधरी, मुकुंदा पाटील यांच्याविरुद्ध भादंवि 120,167, 408, 465, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक उदयसिंग साळुंखे करीत आहेत. (वार्ताहर)