अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अकोल्याच्या प्रियकराविरुध्द गुन्हा

By admin | Published: January 16, 2017 01:07 AM2017-01-16T01:07:39+5:302017-01-16T01:07:39+5:30

जळगाव : अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर प्रसाद नंद (रा.अकोला) याच्याविरुध्द रविवारी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

The crime against Akola's lover for the engineer's suicide | अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अकोल्याच्या प्रियकराविरुध्द गुन्हा

अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अकोल्याच्या प्रियकराविरुध्द गुन्हा

Next


जळगाव : अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर प्रसाद नंद (रा.अकोला) याच्याविरुध्द रविवारी तालुका पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादावाडी परिसरात 2 जानेवारी रोजी स्नेहल महेंद्र जावरे (23,रा.गुरुदत्त हौसिंग सोसायटी, दादावाडी) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती.
स्नेहल व प्रसाद यांचे 2007 पासून प्रेमसंबंध होते. असे असतानाही प्रसाद याने 2 जानेवारी 2016 रोजी  दुस:या मुलीशी लगA केले. लगAानंतरही त्याने स्नेहलशी प्रेमसंबंध ठेवून तिला लगA करण्याचे खोटे आश्वासन दिले. त्याच्या भूलथापांना स्नेहल बळी पडली. प्रसादच्या लगAाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्याच दिवशी स्नेहलने गळफास लावून जीवन संपविले होते. याप्रकरणी वडील महेंद्र जावरे यांच्या फिर्यादीवरुन प्रसादविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

13 दिवसानंतर झाला उलगडा
स्नेहल हिचे शिक्षण एम.ई.झाले होते.उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण घटनेच्या दिवशी स्पष्ट झाले नव्हते, त्यामुळे या घटनेविषयी कोडे निर्माण झाले होते. 13 दिवसानंतर वडीलांनी पोलिसांकडे फिर्याद दिल्याने आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला.

Web Title: The crime against Akola's lover for the engineer's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.