दुकान उघडे ठेवणाऱ्या व्यवसायिकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:48+5:302021-04-15T04:15:48+5:30

जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी बंदचे आदेश दिलेले असताना सुध्दा अर्धे शटर उघडे ठेवून ...

Crime against a businessman who keeps a shop open | दुकान उघडे ठेवणाऱ्या व्यवसायिकावर गुन्हा

दुकान उघडे ठेवणाऱ्या व्यवसायिकावर गुन्हा

Next

जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी बंदचे आदेश दिलेले असताना सुध्दा अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करणाऱ्या फुले मार्केट येथील समाधा या दुकानावर शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी २ वाजता कारवाई केली. याप्रकरणी दुकान मालक विशाल ग्यानचंद ठारानी (३३,रा.सिंधी कॉलनी) यांच्याविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर आस्थापना बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यातच बुधवारी दुपारी शहर पोलीस ठाण्‍यातील कर्मचारी राजकुमार धांडे व प्रफुल्‍ल धांडे हे फुले मार्केट आवारात गस्त घालीत होती. त्यावेळी त्यांना समाधा नावाच कपड्याच्या दुकानाचे अर्धे शटर उघडे दिसले. आत जावून पाहिले असता, पोलिसांनी एक व्यक्ती विनामास्क दुकानात आढळून आला. त्याचे नाव विचारले असता, त्याने विशाल ठारानी असे सांगितले. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर बंदचे आदेश असताना, दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी विशाल ठोरानी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Web Title: Crime against a businessman who keeps a shop open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.