विनापरवानगी आंदोलन जगन सोनवणेंसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:58+5:302021-07-07T04:20:58+5:30

भुसावळ : माजी नगरसेवक व संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ॲट्राॅसिटी कायद्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ...

Crime against office bearers including unauthorized agitation Jagan Sonawane | विनापरवानगी आंदोलन जगन सोनवणेंसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

विनापरवानगी आंदोलन जगन सोनवणेंसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

Next

भुसावळ : माजी नगरसेवक व संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ॲट्राॅसिटी कायद्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार संभाजी गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन करताना कोविड नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने व प्रशासनाची परवानगी न घेता आंदोलन केल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी साडेतीन वाजता जुन्या पालिका कार्यालयासमोर आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला अंडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.

आंदोलनासाठी प्रशासनाची परवानगी घेतली नाही. तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्यासह राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, जयराम पुर्भी, चंदू भागेश्वर, गोपी साळी, आरीफ शेख यांच्यासह अनोळखी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही फिर्याद पोलीस कर्मचारी संदीप परदेशी यांनी दिली आहे. पोलीस नाईक तुषार पाटील हे याबाबत तपास करीत आहेत.

Web Title: Crime against office bearers including unauthorized agitation Jagan Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.