फसवणूकप्रकरणी नशिराबादच्या सरपंचासह दोघांविरुद्ध गुन्हा

By Admin | Published: February 25, 2017 12:57 AM2017-02-25T00:57:50+5:302017-02-25T00:57:50+5:30

नशिराबादच्या सरपंचासह दोघांनी फसवूणक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

The crime against the Sarpanch of Nashikabad in cheating | फसवणूकप्रकरणी नशिराबादच्या सरपंचासह दोघांविरुद्ध गुन्हा

फसवणूकप्रकरणी नशिराबादच्या सरपंचासह दोघांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

जळगाव : शहरातील तांबापुरा येथील दलालाची दोन हजार स्वेअर फुट प्लॉटची कच्ची सौदापावती करून दिलेले १५ लाख घेवून नशिराबादच्या सरपंचासह दोघांनी  फसवूणक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तांबापुरा येथील रहिवासी जसवंत ब्रिजलाल मोरे (वय ४९) यांचा शेती व प्लॉट खरेदीचा व्यवसाय आहे. दोन वषार्पूर्वी नशिराबाद येथील सरपंच खिलचंद दगडू रोटे व नाशिक येथील कांचन अरुण वाणी यांचा मालकीचा गट नंबर ११९/२ प्लॉट नंबर २ हा दोन हजार स्केअर फूट प्लॉटचा व्यवहार २४ फेब्रुवारी २०१४ ला मोरे यांच्या घरी साक्षीदार सुनील पाठक, सुरेश पाटील यांच्या समोर झाला होता. यावेळी मोरे यांच्याकडून रोटे व वाणी यांनी १५ लाख रुपये आगाऊ रक्कम घेवून कच्ची सौदा पावती करून दोन महिन्यानंतर पक्की खरेदी करून देण्याचे सांगितले होते.
दरम्यान, या प्रकरणी सरपंच खिलचंद रोटे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.


तीन वर्षानंतरही पक्की खरेदी नाही
मोरे यांनी प्लॉट खरेदीसाठी दोघांकडे तगादा लावला़ यानंतर रोटे व वाणी यांनी २९ जानेवारी २०१६ मध्ये विनामुल्य हक्कसोड पत्र तयार करून दिले होते. तीन वर्ष होवून देखील प्लॉट खरेदी करून देत नसल्याने तसेच व्यवहाराच्या वेळी घेतलेले १५ लाखाची रक्कम देखील देत परत देत नसल्याने मोरे फसवणुकीची खात्री झाली़ त्यांनी २४ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यावरून खिलचंद रोटे व कांचन वाणी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: The crime against the Sarpanch of Nashikabad in cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.