अमळनेरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याने दोघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:51 PM2018-09-27T22:51:57+5:302018-09-27T22:53:38+5:30

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया व न.पा.च्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना धमकी देणाºया दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

The crime against the two because of throwing garbage in public | अमळनेरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याने दोघांविरूद्ध गुन्हा

अमळनेरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याने दोघांविरूद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देनगरपालिकेकडून कठोर उपाययोजनाअमळनेर न.पा.च्या आरोग्य विभागाची कारवाईमुख्याधिकाऱ्यांनी केले स्वच्छता ठेवण्याचे आवाहन

अमळनेर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया व न.पा.च्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना धमकी देणाºया दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या साथीच्या अनुषगाने नगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत.
आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी मुकादम अनिल बेंडवाल व अनिल बाविस्कर यांना २५ रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान ही कारवाई केली. अनिल बेंडवाल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला नरेश कालू कल्याणे व बागवानविरुद्ध भादंवि २६९, १८६ प्रमाणे व महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ च्या कलम ३ तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.
 

Web Title: The crime against the two because of throwing garbage in public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.