धक्कादायक! घरगुती भांडण गेलं विकोपाला; पतीने घेतलं विष तर पत्नीची 2 मुलींसह आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:54 AM2022-03-03T11:54:07+5:302022-03-03T11:55:12+5:30
Crime News : पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
रावसाहेब पाटील
चोपडा जि.जळगाव - घरगुती कारणावरुन भांडण झाल्याने पतीने संतापात विष घेतले. यानंतर पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बिडगाव ता. चोपडा येथे बुधवारी रात्री १० वाजता घडली.
विनोद विक्रम सपकाळे (३८) असे विष घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने विष घेतल्याचे समजल्यावर पत्नी वर्षा सपकाळे हिने कीर्ती (८) व मोनिका ( ४) या दोन मुलींसह विहीरीत उडी घेतली. रात्रभर शोध घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी माय लेकींचे मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळून आले.
विनोद यास जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने बिडगाव हादरले आहे. सपकाळे परिवार खामखेडा ता. शिरपूर येथील रहिवासी आहे. सपोनि किरण दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मृतदेह विहिरीतून काढत शवविच्छेदनासाठी रवाना केले.