जळगाव महापालिकेच्या तत्कालिन उपायुक्तावर बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 02:47 PM2018-05-06T14:47:55+5:302018-05-06T14:47:55+5:30

मनपात नोकरीला लावून देणे, घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनपाचे तत्कालिन उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी साजिद अमानउल्ला पठाण (वय ५० रा.शिवाजी नगर,जळगाव) यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ३५ वर्षीय विधवा महिलेने पठाण यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

The crime of rape on the then Deputy Commissioner of Jalgaon Municipal Corporation | जळगाव महापालिकेच्या तत्कालिन उपायुक्तावर बलात्काराचा गुन्हा

जळगाव महापालिकेच्या तत्कालिन उपायुक्तावर बलात्काराचा गुन्हा

Next
ठळक मुद्दे लग्न व नोकरीचे आमिष दाखवून केले लैंगिक शोषण जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हासरकारी कारमध्येही केला अत्याचार

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६  : मनपात नोकरीला लावून देणे, घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनपाचे तत्कालिन उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी साजिद अमानउल्ला पठाण (वय ५० रा.शिवाजी नगर,जळगाव) यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ३५ वर्षीय विधवा महिलेने पठाण यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,विधवा व गरीब महिलांना मनपाकडून घरकुल मिळेल अशी २०११ मध्ये वृत्तपत्रात जाहीरात आल्यानंतर पीडित विधवा महिला एका महिलेसोबत महापालिकेत उपायुक्त साजीद पठाण यांना भेटायला गेली होती. त्यावेळी पठाण यांनी नोकरीला लावूनज देण्याचे आश्वासन दिले व त्यांचा मोबाईल क्रमांक देऊन नंतर भेटण्याचे आश्वासन दिले होते.त्यानंतर पठाण व पीडित महिला या दोघांमध्ये संपर्क वाढत गेला.
शंभू सोनवणेच्या घरात केला अत्याचार
२०१२ मध्ये पठाण यांनी नोकरीचे कारण सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे राहणाºया शंभू सोनवणे यांच्या घरात व कार्यालयात बोलावले. तेथे शंभू सोनवणे व पठाण असे दोघंच होते. थोड्यावेळाने पठाण यांनी सोनवणे यांच्या बेडरुममध्ये नेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी मनस्थिती खराब झाल्याचे पाहून पठाण यांनी लग्नाचे आमिष दाखविले.
सरकारी कारमध्येही केला बलात्कार
शंभू सोनवणे यांच्या घरातील प्रकारानंतर पठाण यांनी एक महिन्याने लग्नासाठी औरंगाबादला जायचे आहे असे सांगून सरकारी कारमध्ये औरंगाबादकडे नेले. तेथे रस्त्यात अजिंठा गावाच्या पुढे गेल्यावर कोणाचा तरी फोन आला व त्यावेळी पठाण यांनी कार माघारी घेतली.  मोकळ्या स्मशान जागी कार लावून त्यातच जबरदस्तीने पुन्हा अत्याचार केला. या घटनेनंतर पुन्हा गेंदालाल मील भागातील डॉ.राजेश पाटील यांच्या दवाखान्यात बोलावून तेथेही अत्याचार केला. 
शंभू पाटील, डॉ.राजेश पाटील सह आरोपी
अत्याचार प्रकरणात डॉ.शंभू पाटील व गेंदालाल मील भागातील डॉ.राजेश पाटील यांनी एक प्रकारे पठाण यांना मदत केली आहे. त्यामुळे पीडित महिलेने या दोघांविरुध्दही तक्रार दिल्याने त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. २०१६ नंतर साजीद पठाण यांची मुंबई येथे मंत्रालयात बदली झाल्याने त्याने संपर्क कमी केला व लग्नही केले नाही. फसवणूक केल्याची खात्री झाल्याने पीडित महिलेने शनिवारी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर तपास करीत आहेत.

Web Title: The crime of rape on the then Deputy Commissioner of Jalgaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.