भाजपच्या महिला व युवक जिल्हाध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:02+5:302021-07-07T04:21:02+5:30

जळगाव : विधानसभेत भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यासह १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आघाडी सरकारची तिरडी काढून आंदोलन करणाऱ्या ...

Crimes against 11 persons including BJP women and youth district presidents | भाजपच्या महिला व युवक जिल्हाध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हे

भाजपच्या महिला व युवक जिल्हाध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हे

Next

जळगाव : विधानसभेत भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यासह १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आघाडी सरकारची तिरडी काढून आंदोलन करणाऱ्या भाजयुमाचे जिल्हाध्यक्ष आनंदा सपकाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दीप्ती चिरमाडे यांच्यासह ११ जणांविरुद्ध मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात शासन आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत सोमवारी विधानसभेत आमदार गिरीश महाजन, जयकुमार रावळ यांच्यासह १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. सकाळी झालेल्या या कारवाईच्या निषेधार्थ सायंकाळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टॉवर चौकात सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून या आमदारांचे निलंबन रद्द करा म्हणून घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये व फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) चे जमावबंदी आदेश जारी केले आहेत. त्याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलम १८८, २६९, २७०, २७१ चे कलम ५१ (१) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे गोपनीयचे कर्मचारी नरेंद्र अशोक ठाकरे यांनी फिर्याद दिली आहे. भाजयुमाचे जिल्हाध्यक्ष आनंदा सपकाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दीप्ती चिरमाडे, उपाध्यक्षा जयश्री पाटील, राजू मराठे, पिंटू काळे, अजित राणे, विनोद महाजन, जयेश भावसार, भूषण भोळे, वंदना पाटील व पुष्पा चौधरी यांचा समावेश आहे. तपास हवालदार रवींद्र सोनार करीत आहेत.

Web Title: Crimes against 11 persons including BJP women and youth district presidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.