विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या ६० जणांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:55 PM2020-03-31T16:55:33+5:302020-03-31T16:55:49+5:30

२७ वाहने घेतली ताब्यात : भुसावळ उपविभागात पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

Crimes against 3 people who move out of the house without cause | विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या ६० जणांविरुद्ध गुन्हे

विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या ६० जणांविरुद्ध गुन्हे

Next

भुसावळ : संचारबंदीत शहरातील रस्त्यांवर विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. भुसावळ उपविभागात ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन २६ वाहने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती डिवायएसपी गजानन राठोड यांनी दिली.
शहरात बाजारपेठ पोलिस ठाण्यातर्फे १७ जणांवर कारवाई केली असून, त्यांची वाहने जप्त केली आहे. यामध्ये कैलास कुकरेजा, राहुल महाजन, बॉबी ढिक्याव, मनिष कटीयारा, स्वप्निल गवई, गौरव भाकरे, जयेश भाकरे, संजीव महाजन, शंकर गोगीया, शेख खलील, राजकुमार मेघानी, राजेश सोनवणे, तुषार कोरोसिया, दिप रामचरण टाक, राज रत्नानी, सुनील पाटील, पंकज जेधिया यांच्यावर गुन्हे दाखल करुन वाहने जप्त केली.
डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत , सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय भदाने, तसलीम पठाण, ईश्वर भालेराव, रवींद्र बिराडे, विकास सातदिवे, नंदू सोनवणे, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, रमण सुरडकर, समाधान पाटील, सचिन पोळ व भालेराव आदींनी ही कारवाई केली आहे.
तालुका पोलिसात ११ गुन्हे
तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अकरा जणांविरुध्द कारवाई करण्यात आली असून, यात धनराज मख, सचिन पवार, रवींद्र भोगे, उन्मेश पट्टे (सर्व रा. बेटावद, ता. जामनेर), हितेश गुजर (शिंदी), आशिक मन्सुरी (शिंदी), समाधान मराठे (चोरवड), नासीर शहा ( फेकरी), प्रताप पावरा (निंभोरा), जयराम सुरवाडे (सुरवाडा ता. बोदवड), भिमसिंग पावरा (मध्यप्रदेश) यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पो. कॉ. युनूस शेख, विठ्ठल फुसे, राजेश पवार, राहुल महाजन, चालक काझी आदींनी कारवाई केली आहे. तर शहर पोलिस ठाण्यात दहा जणांविरुध्द गुन्हे दाखल करुन तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: Crimes against 3 people who move out of the house without cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.