आगमन मिरवणूक काढणा-या मंडळाच्या पदाधिका-यांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 08:22 PM2020-08-26T20:22:07+5:302020-08-26T20:41:42+5:30

व्हीडीओ व्हायरल करणे भोवले : नवी पेठ मित्र मंडळावर कारवाई

Crimes against the office bearers of the board who took out the immersion procession | आगमन मिरवणूक काढणा-या मंडळाच्या पदाधिका-यांविरुध्द गुन्हा

आगमन मिरवणूक काढणा-या मंडळाच्या पदाधिका-यांविरुध्द गुन्हा

Next

जळगाव: कोरोनाच्या पाश्‍र्वभूमीवर गणेशाचे आगमन तसेच विसर्जन मिरवणूक काढण्यासह वाद्य वाजविण्यास बंदी असतांनाही २२ रोजी आगमनाची वाजत गाजत मिरवणूक काढणा‍ऱ्या नवीपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजीनदार, सचिव, सल्लागार व कार्यकर्त्यांविरोधात बुधवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल होवून तो सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्यापर्यंत पोहचला होता, त्यानुसार शहर पोलिसांनी केलेल्या तपासणीत तो नवीपेठ मित्र मंडळाचा असल्याने निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी पेठ मंडळाने २२ आॅगस्ट रोजी स्थापनेच्या दिवशी श्री गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. त्याचा व्हिडीओ पाच दिवसानंतर व्हायरल झाला. बुधवारी पाच दिवसानंतर हा व्हीडीओ सहायक पोलीस उपअधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्यापर्यंत पोहचला. त्यांनी हा व्हिडीओ त्यांनी पडताळणीसाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांना पाठविला. चौकशीअंती व्हिडीओत जागा नवीपेठेतील सारस्वत चौकाकडून जयप्रकाश नारायण चौकाकडे जाणारा रस्ता दिसून येत होता. तसेच आठ ते दहा कार्येकर्ते नाचतांना दिसून येते होते. सार्वजनिक गणेश मंडळ हे नवीपेठ मित्र मंडळ असल्याचे निष्पन्न झाले होते.
यांच्याविरुध्द झाला गुन्हा दाखल
शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस नाईक मनोष सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन नवीपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद नारायण अग्रवाल, उपाध्यक्ष मनिष शामसुंदर झंवर, खजीनदार विनोद अशोक मुंदडा, सचिव सुनील सुरेश जोशी, सल्लागार अमोल राजेंद्र जोशी, मिरवणुकीत नाचणारे कार्यकत, वाद्य वाजविणारे तसेच वाहनमालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वाद्य ताशा तसेच मिरवणुकी वाहन तीनचाकी रिक्षाही जप्त करण्यात येणार आहे.

Web Title: Crimes against the office bearers of the board who took out the immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.