एक कोटीच्या अपहारप्रकरणी कृषी अधिकाºयाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 12:29 AM2017-01-04T00:29:08+5:302017-01-04T00:29:08+5:30
शेततळे अपहार प्रकरण : शासनाची फसवणूक
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रुक व खडकला येथे शेतकºयांच्या नावे कागदोपत्री शेततळे तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयाविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कृषी अधिकारी मोतीराम सुपा वळवी यांनी मांडवी बुद्रुक आणि खडकला या दोन गावांमध्ये शेततळे तयार करण्याच्या कामांना मंजूरी दिली होती़ यात त्यांनी लाभार्थी शेतकºयांचे बनावट दस्तावेज व खोटी मोजमापे करून त्यांच्या नावे आलेल्या पैशांचा अपहार केल्याची तक्रार होती़याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते़ या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर त्यात तथ्य आढळून आले होते़ त्यानुसार धडगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भीमराव देवमन मोहिते यांनी धडगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली़ मोतीराम वळवी, मंगेश लोटन पावरा व पिसा टेंभा वळवी दोघे राख़र्डा, ता़ धडगाव यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत एक कोटी ७४ हजार ९६६ रूपयांच्या शेततळ्यांना बोगस पद्धतीने बनावट कागदपत्रे तयार करून मंजुरी देत शासनाची फसवणूक केली़ बनावट कागदपत्रांद्वारे शेततळ्यांची खोटी मोजमापेही दर्शवली़ त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे़