खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार

By सुनील पाटील | Published: August 31, 2022 01:55 PM2022-08-31T13:55:46+5:302022-08-31T13:55:52+5:30

दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

Criminal exile for two years on bail for murder | खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार

खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार

googlenewsNext

जळगाव

खुनाच्या गुन्ह्यात जामीन झाल्यावर कारागृहातून बाहेर पडताच भूषण उर्फ भासा विजय माळी (वय २२) व सचिन उर्फ टीचकुल कैलास चौधरी (वय २२) दोन्ही रा.तुकारामवाडी या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी हे आदेश काढले आहेत.

भूषण माळी हा टोळी प्रमुख असून सचिन हा त्याचा साथीदार आहे. माळीच्या टोळीने शहरात खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे गुन्हे केलेले आहेत. १८ मार्च रोजी भूषण माळी, सचिन चौधरी व त्याच्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात सूरज विजय ओतारी याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यात दोघं जण कारागृहात होते. दोन दिवसापूर्वी सचिन याला न्यायालयाने जामीन मंजूर केला तर मंगळवारी भूषण याची जामीनावर कारागृहातून सुटका झाली. 

भूषण याच्यावर खुनाचे २, दरोडा, जबरी चोरी, मारामारी व अवैध शस्त्रे बाळगणे यासारखे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत तर सचिन याच्याविरुध्द खुनाचा १, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे ७ गुन्हे दाखल झालेले आहेत. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता टोळीला हद्दपार करण्याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे स्वत:च्या अधिकारात टोळी प्रमुख भूषण व सचिन या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले. सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील व साईनाथ मुंढे यांनी दोघांना बुधवारी हद्दपारीची नोटीस बजावून शहराबाहेर रवाना केले.  

Web Title: Criminal exile for two years on bail for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव