नियोजनाअभावी पिकांना फटका
By admin | Published: May 4, 2017 12:15 AM2017-05-04T00:15:21+5:302017-05-04T00:15:21+5:30
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : मका-बाजरी धोक्यात, गाव तलावात पाणी सोडण्याची मागणी
आडगाव, ता. चाळीसगाव : मन्याड धरणातून नुकतेच पाण्याचे तिसरे आवर्तन सोडले गेले. त्याचा लाभ मोजक्याच शेतकºयांना झाला असून उर्वरित शेतकºयांचे मका-बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पाटचारी क्रमांक ११ व देवळी मायनरवरील शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. याला पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप रावसाहेब गोविंदा पाटील, किरण शिवाजी पाटील, अविनाश सदाशिव पाटील, जालिंदर जगन्नाथ पाटील, विनोद तुकाराम पाटील आदींनी केला आहे.
पाणी नियोजन हुकले
धरण यंदा १०० टक्के भरल्याने तीन-चार आवर्तने अपेक्षित होती, परंतु पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे केवळ दोन आवर्तने व्यवस्थित मिळाली. तिसरे आवर्तन लवकर देऊन एक नंबर सेक्शनला पाणी टाकण्याची घाई केली व इकडचे शेतकरी काही जेवले तर काही उपाशी राहिले. एक नंबर सेक्शनला पाणी विकल्याचा आरोपदेखील वरील शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे आमच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
गिरणेला आवर्तन मग
मन्याड नदीत पाणी कसे?
मन्याड धरणातून ५० ते ६० क्युसेसचा प्रवाह सुरू आहे. यातील ४० क्युसेस पाणी चारी क्रमांक ६ ला सुरू आहे तर उर्वरित २० क्युसेस पाणी सायगावच्या मन्याड नदीत सोडले आहे. इकडे शेतकरी पिकांना पाणी भरण्यासाठी धडपडत आहे तर दुसरीकडे पाणी या चारीला व नदीला सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता धरणात पाणीच शिल्लक नाही. तुमच्यापर्यंत पाणी येणे शक्य नाही असे बोलले जात आहे.
पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केले असते तर चारी क्रमांक ६ पासून तर १२ पर्यंत सर्व चारींना किमान चार-पाच दिवस पाणी चालले असते. शिवाय भरणा क्षेत्रदेखील कमी झाले होते. परंतु मेन कॅनॉलवर कुणाचाही अंकुश नसल्याने वाटेल तेव्हा मनाला पटेल त्याप्रमाणे पाणी लावताना प्रत्यक्ष पाहणीवरून दिसले. याशिवाय मेन कॅनालला अर्धवट कोरुन बºयाच शेतकºयांनी पाईप टाकून पाणी चोरी केल्याचे दिसून आले. काही शेतकºयांनी विहिरींना पाणी उतरावे म्हणून नाले, डबके, केटीवेअर भरून घेतले. अशा पाणी चोरांवर पाटबंधारे विभागाने काय कारवाई केली, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.