वादळाच्या तडाख्याने पिके भूईसपाट
By admin | Published: September 14, 2015 12:59 AM2015-09-14T00:59:08+5:302015-09-14T00:59:08+5:30
जळगाव : शनिवारी दुपारी जळगाव तालुक्याला वादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यात केळी, कपाशी, ऊस, मका, सोयाबीन व ज्वारी आदी पिकांचे कोटय़वधीचे नुकसान झाले.
जळगाव : शनिवारी दुपारी जळगाव तालुक्याला वादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यात केळी, कपाशी, ऊस, मका, सोयाबीन व ज्वारी आदी पिकांचे कोटय़वधीचे नुकसान झाले. शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. आव्हाणे, खेडी, फुपनगरी, कानळदा, नांद्रा, रेल, डिकसाई, आवार, पिलखेडा, कुवारखेडा आदी भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोटय़वधीचे नुकसान होऊनही रविवारी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले नाही, त्यामुळे शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली. घरांचीही पडझड़़़ कानळदा गावातील पाच ते सहा घरांवर जोरदार वा:यामुळे वृक्ष उन्मळून पडल्याने नुकसान झाले आह़े तीन घरांवर समोरच असलेला एक मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने तीन घरांचे छत दाबले गेल़े यामुळे घरातील कपडे, धान्य व भांडे आदींसह संसारोपयोगी साहित्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आह़े केळी उत्पादकांना पीक विमा नाही कानळदा शिवारातील केळीच्या शेतीची मोठी हानी झाली आह़े काही शेतक:यांच्या केळीचा पीक विमा काढलेला नसल्याने या शेतक:यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याने ते हवालदिल झाले आहेत़ स्टेट बँकेतर्फे शेतक:यांना दिल्या जाणा:या पीककर्जातूनच कपात करून कंपनीकडून केळी व इतर पिकांचा विमा दरवर्षी दिला जातो़ मात्र गावातील विविध कार्यकारी सोसायटीने या वर्षी केळी पिकाचा विमा न काढल्याने आम्हाला नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे काही शेतक:यांनी या वेळी ‘लोकमत’ कडे सांगितल़े फुपनगरी शिवारात केळी व घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. ------------------- पालकमंत्र्यांनी व आमदारांनी शेतक:यांच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, त्यानंतर सर्व नुकसानग्रस्त शेतक:यांना योग्य ती भरपाई मिळेल याकडेही लक्ष द्याव़े -भूषण चव्हाण, शेतकरी, कानळदा़ माङयाकडे असलेल्या गावात आज पाहणी केली़ त्यामध्ये अनेक ठिकाणी घरांवरची पत्रे उडाली आहेत़ वादळामुळे पिकांचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आल़े वरिष्ठांच्या आदेशानुसार सोमवारपासून पंचनामे करण्यात येतील. -सी़. एस़ किनगे, तलाठी, कानळदा़ विजेचे खांब कोसळले डिकसाई, आव्हाणे व कानळदा शिवारात वारा-वादळामुळे विजेचे खांब कोसळल्याने शेतांमध्ये, घरांवर आणि रस्त्यावरही अनेक ठिकाणी विजेच्या तारा पडल्या आहेत़ आमदार गुलाबराव पाटील व पं़स़चे माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी दुपारी परिसरातील नुकसानीचा पाहणी दौरा करून, शेतक:यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.