चोपडा तालुक्यात ७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:11+5:302021-05-31T04:13:11+5:30

सर्वाधिक नुकसान वर्डी गावचे झाले. या ठिकाणी आमदार लताताई सोनवणे यांनी सकाळी १० वाजता सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह भेट ...

Crop damage on 72 hectares in Chopda taluka | चोपडा तालुक्यात ७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

चोपडा तालुक्यात ७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Next

सर्वाधिक नुकसान वर्डी गावचे झाले. या ठिकाणी आमदार लताताई सोनवणे यांनी सकाळी १० वाजता सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह भेट दिली. अनेक घरांचे पत्रे उडाल्याने पावसाच्या पाण्यात अन्नधान्य भिजले. अशांना तत्काळ सानुग्रह अनुदान मंजूर करा, शेत व गावातील ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी भरत कोसोदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, महावितरण कंपनीचे एन.एस. रास्कर, एम.के. बढे, ग्रामविकास अधिकारी यहिदे तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते, तसेच वर्डी येथे दिलीप पाटील, माजी सभापती कांतीलाल पाटील, भोला पाटील, दत्तू पाटील, महेंद्र पाटील, मच्छिंद्र साळुंखे, नंदलाल धनगर, मार्तंड कोळी, पोलीस पाटील पद्माकर नाथ आदी उपस्थित होते. वेले येथे घरांच्या पडझडीचीही पाहणी केली. त्यावेळी बुधा आत्माराम पाटील, खटाबाई भिल यांच्या घराच्या नुकसानीची पाहणी आमदार सोनवणे यांनी केली. यावेळी सरपंच वैजयंती पाटील, अशोक पाटील, संतोष नारायण पाटील, मधुकर पंडित पाटील, दीपक पाटील, प्रवीण बाविस्कर, विनोद पाटील, तलाठी ग्रामसेवक जनार्दन विसावे आदी उपस्थित होते.

नारोद येथे आमदार लता सोनवणे यांनी महारू पाटील, धनराज पाटील, नवल पाटील, लक्ष्मण पाटील, रामदास पाटील, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील, अनिल पाटील, संजय पाटील यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी राहुल पाटील, संदीप पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र पाटील, अंकुश पाटील, नारायण पाटील, दीपक पाटील, अरविंद पाटील आदी उपस्थित होते.

चाैकट

तालुक्यात वर्डी, नारोद व वेले येथे सर्वाधिक नुकसान झाले. तालुक्यातील १०८ शेतकऱ्यांचे केळी, पपई, आंबा, लिंबू या फळबागांसाह उन्हाळी मुगाचे मिळून ७२ हेक्टरच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने पाठविला आहे.

===Photopath===

300521\30jal_3_30052021_12.jpg

===Caption===

चोपडा तालुक्यात ७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Web Title: Crop damage on 72 hectares in Chopda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.