शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:46 PM2019-06-25T22:46:00+5:302019-06-25T22:47:52+5:30

अमळनेर, पारोळा : या शहरांमध्ये तालुका शिवसेनेतर्फे शेतक-यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. पीक विम्यापासून वंचित ...

Crop Insurance Help Center for Farmers | शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र

शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र

Next



अमळनेर, पारोळा : या शहरांमध्ये तालुका शिवसेनेतर्फे शेतक-यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांच्या शंकांचे निरसण करण्यासाठी या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
अमळनेर शिवसेनेतर्फे शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स, व्यंकटेश अ‍ॅग्रो शॉपजवळ फॉर्म मदत स्टॉल उभारून भरून घेण्याचे काम २५ रोजी सुरू होते.पारोळा येथे शिवसेनेतर्फे शेतकरी पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन
पारोळा : येथील शेतकरी संघात पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन बाजार समिती सभापती, जिल्हा बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, चतुर भाऊसाहेब पाटील, जिजाबराव बापू पाटील, दिलीप पाटील, मधुकर पाटील, भिकन महाजन, शहरप्रमुख अशोक भाऊ मराठे, पी. के. पाटील, राजू कासार आदी उपस्थित होते.

Web Title: Crop Insurance Help Center for Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.