गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळ्यासाठी चुंचाळे येथे राज्यभरातील भाविकांची गर्दी

By admin | Published: May 7, 2017 12:30 PM2017-05-07T12:30:29+5:302017-05-07T12:30:29+5:30

श्री रघुनाथ बाबा व त्यांचे शिष्य श्री वासुदेवबाबा यांचा रविवार,7 मे रोजी साजरी होणा:या पुण्यतिथी सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आह़े

A crowd of devotees across the state at Chaukle for the Gurbachan Punyitithi | गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळ्यासाठी चुंचाळे येथे राज्यभरातील भाविकांची गर्दी

गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळ्यासाठी चुंचाळे येथे राज्यभरातील भाविकांची गर्दी

Next

 चुंचाळे, ता.यावल, दि.7- श्री रघुनाथ बाबा व  त्यांचे शिष्य श्री वासुदेवबाबा यांचा एकाच तिर्थावर वैशाख शुद्ध बारसला रविवार, 7 मे रोजी साजरी होणा:या पुण्यतिथी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरातमधील भाविकांनी मोठी गर्दी केली आह़े रविवारी सकाळी 11़30 वाजेच्या सुमारास नगराज महाराज व सुरतचे दत्ता महाराज यांच्या हस्ते  होम हवन व महाआरती करण्यात आली़ प्रसंगी समाधीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती़

दरम्यान, चुंचाळे गाव  सुकनाथबाबांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. श्री सुकनाथ बाबा यांनी चुंचाळे गावात  12 वर्षे तपश्चर्या केली.  श्री रघुनाथ बाबा यांचा   जन्म चुंचाळे येथे झाला मात्र त्यांनी वड्री, ता.चोपडा येथे त्यांचे पिता श्री सुकनाथबाबांच्या मंदिराची निर्मिती केली. श्री रघुनाथबाबा हे सन 1979 मध्ये वैशाख शुद्ध बारसला समाधीस्त झाले. 

Web Title: A crowd of devotees across the state at Chaukle for the Gurbachan Punyitithi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.