संजीवन समाधीच्या दर्शनासाठी रावेर शहरासह परिसरातील भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 05:54 PM2018-09-03T17:54:19+5:302018-09-03T17:55:17+5:30
श्री संत रामस्वामी पुण्यतिथी सोहळा उत्साहात
रावेर, जि.जळगाव : येथील श्री स्वामी विवेकानंद चौकातील परमसंत श्री रामस्वामी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात व भावभक्तीने साजरा करण्यात आला. दरम्यान, समाधी स्थळावर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
तब्बल ३५० ते ४०० वर्षापूर्वी दाक्षिणात्य संतश्री रामस्वामी महाराज यांनी आजमितीस मध्यवर्ती ठिकाणी असलेला श्री रामस्वामी मठ प्राचीन काळी वनात होता. दरम्यान, तत्कालीन श्री रोकडा हनुमान मंदिराच्या परिसरात वसलेल्या रावेर गावावर काही तरी अरिष्ट आल्याने श्रीसंत रामस्वामी महाराजांच्या आश्रयाने या भागात गाव वसले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीसंत रामस्वामी महाराज हे रावेरवासियांचे असीम श्रध्दास्थान ठरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही श्री संत रामस्वामी महाराजांचे दर्शन घेतल्याची अख्यायिका सर्वश्रुत आहे. सुमारे ३५० ते ४०० वर्षांपूर्वी श्रीसंत रामस्वामी महाराजांनी जिवंत संजीवन समाधी घेतली होती.
त्या अनुषंगाने आज श्री रामस्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रामस्वामी मठात अॅड.शीतल जोशी व प्रतीक्षा जोशी यांच्याहस्ते श्रींच्या संजीवन समाधीवर मंत्रोच्चाराच्या पुष्पांजलीत रूद्राभिषेक व षोडशोपचाराने पूजन करण्यात आले. दरम्यान, महाआरती, भजन व महाप्रसादाचा धार्मिक सोहळा झाला. पं.संजय मटकरी, अनिल कुलकर्णी, प्रकाश दुबे, मुकेश दुबे आदींनी पौरोहित्य केले.
केºहाळे येथील रघुनाथ पाटील यांचा भावगीतांचा भजनसंध्येचा सुमधूर कार्यक्रम झाला. समस्त ब्रह्मवृंद समाजाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश मुजुमदार, उपाध्यक्ष अरविंद पाठक, सचिव भानुदास कुलकर्णी, सुधाकर वैद्य, अ.वि. रावेरकर, डॉ.राजेंद्र आठवले, प्रकाश जोशी, संजय लिमये, जयंत कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, कैलास पाठक, प्रभुदत्त मिसर, मंगला मुजुमदार, तेजश्री आठवले, तरूणा देव, मेघा भागवत, भारती कुलकर्णी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.