श्रीरामाचा रथोत्सव, उल्हासीत सारे जळगाव; रथोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 07:17 PM2017-10-31T19:17:05+5:302017-10-31T19:21:28+5:30

प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमली सुवर्णनगरी

The crowd of devotees for the rathotsav | श्रीरामाचा रथोत्सव, उल्हासीत सारे जळगाव; रथोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी

श्रीरामाचा रथोत्सव, उल्हासीत सारे जळगाव; रथोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी

Next
ठळक मुद्देगिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांनी ओढला रथअभूतपूर्व सोहळा वेदमंत्राच्या घोषाने वातावरण प्रसन्न

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 -  पवित्र वेदमंत्रांचा घोष, घंटा व शंखनाद अशा पवित्र वातावरणात ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्याहस्ते  रथाच्या पूजनाने प्रभू रामचंद्र यांच्या रथोत्सवास मंगळवारी  मोठय़ा उत्साहात मंगळवारी दुपारी 12.55 वाजता  प्रारंभ झाला. सनईचे मंजूळ स्वर, तुता:या, नगा:याचा निनाद, त्यातच भाविकांच्या मुखातून निघणारा प्रभू श्रीरामाचा जयघोष अशा अतिशय भक्तीमय, उत्साहवर्धक वातावरणात रथाची आरती, त्यानंतर मंदिरात उत्सव मूर्तीची आरती, उत्सव मूर्तीचे रथावर आगमन व पुन्हा श्रीरामाचा जयघोष करीत हा रथ  मार्गस्थ झाला. यावेळी जिल्ह्यासह राज्याच्या कान्याकोप:यातून आलेल्या अबालवृद्धांनी रथाचे दर्शन घेतले. 

वेदमंत्राच्या घोषाने वातावरण प्रसन्न
ब्रrावृदांकडून होणारा वेदमंत्राचा घोष वातावरणातील भक्ती वाढविणारा  होता. समोर उंच रथ, त्यासमोर बसलेली मान्यवर मंडळी, सोबत एका बाजूला मोगरीची परंपरा जपणारी मंडळी, पूजा विधी करणारे ह.भ.प. मंगेश महाराज  निमंत्रित मंडळी, रथोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य तर दुस:या बाजुला मंत्र पठण करणारे ब्रrावृंद असे वातावरण होते. 

अभूतपूर्व सोहळा 
1872 मध्ये सद्गुरू अप्पा महाराजांनी सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन सुरू केलेल्या रथोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा जळगावकरांनी याची देही याची डोळा  अनुभवला. श्रीराम मंदिर संस्थानच्या बाहेर अक्षरश: जनसागर उसळला  होता. 

गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांनी ओढला रथ
रथाच्या पूजा विधीसाठी   जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर  गणेश सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,  जिल्हापोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उपअधीक्षक सचिन सांगळे, तहसीलदार अमोल निकम, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर सुनील महाजन, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील,  कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, केशवस्मृतीप्रतिष्ठानचेअध्यक्षभरत अमळकर, अॅड. सुशील अत्रे, दादा नेवे, माजी महापौर विष्णू भंगाळे, श्रीकांत खटोड, गिरीश कुळकर्णी, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आदी मान्यवर  उपस्थित होते. 
जळगाव नगरीचे ग्रामदैवत म्हणून ख्याती असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानचा रथोत्सव मंगळवारी अभूतपूर्व उत्साहामध्ये पार पडला. रथ यात्रेस श्रीराम मंदिरापासून सुरुवात झाल्यानंतर कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, राम मंदिराचे मागील गल्लीतून रथ चौक, बोहरा गल्लीत पोहचला. 

Web Title: The crowd of devotees for the rathotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.