जळगावात गोविंदाला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी

By Admin | Published: May 14, 2017 05:22 PM2017-05-14T17:22:47+5:302017-05-14T17:22:47+5:30

हॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर गोविंदाने बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले.

A crowd of fans to see Govinda in Jalgaon | जळगावात गोविंदाला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी

जळगावात गोविंदाला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 14 -  सिनेअभिनेता गोविंदा यास पाहण्यासाठी रविवारी शहरात  चाहत्यांची प्रंचड गर्दी झाली. यातच गोविंदाला येण्यास तासभर उशीर झाला, तरीदेखील चाहते जागेवरून हलले नाहीत. भर उन्हात चाहते ताटकळले. हॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर गोविंदाने बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करीत उपस्थितांची मने जिंकली. 
शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी गोविंदा आला. दुपारी 12.30 वाजता तो येईल, असे संयोजकांनी सांगितले होते. परंतु त्याला येण्यास तासभर उशीर झाला. तोर्पयत व.वा.वाचनालय, देशमुख शाळा व या भागातील मुख्य रस्त्यांवर अनेक चाहते थांबले.
दुपारी 1.34 वाजता गोविंदाचे आगमन झाले. पांढ:या रंगाच्या महागडय़ा चारचाकीतून तो आला. त्याचे आगमन होताच चारचाकीभोवती चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. अनेकांनी मोबाईलमध्ये  त्याची छायाचित्रे व व्हीडीओ काढण्यास सुरुवात केली.
प्रचंड लोटालोटी व बाउन्सरचा हस्तक्षेप
प्रचंड लोटालोटी व आरडाओरड सुरू झाली. अशातच 10 ते 12 बाउन्सरांनी गोविंदाभोवती साखळी तयार केली व त्याला हॉटेलात सुरक्षितपणे नेण्यात आले.
चाहत्यांना अभिवादन व गणपती बाप्पांचा जयजयकार
हॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर गोविंदाने बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ म्हणत त्याने गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष केला. या वेळी चाहत्यांनी एकच आनंद व्यक्त करीत प्रतिसाद दिला.
बडी मासूम लगती थी
नंतर गोविंदाने बडी मासूम लगती थी तू रे.. बडी तपती थी तू रे मै देखता था तब.., हे गाणे सादर करून उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.
जळगावात प्रेम मिळाले
गोविंदाने जळगावात आल्याचा विशेष आनंद होत आहे. मला जळगावात प्रेम मिळाले. चाहते एवढय़ा उन्हात भर रस्त्यावर उभे आहेत. खूप प्रेम चाहत्यांकडून मिळाले, असे म्हणत गोविंदाने चाहत्यांचा निरोप घेतला.

Web Title: A crowd of fans to see Govinda in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.