फळाच्या गाडीवर गर्दी, विक्रेत्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:17 AM2021-05-27T04:17:45+5:302021-05-27T04:17:45+5:30
त्याचवेळेस बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड हे गस्त घालत असताना फळाच्या दुकानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने ...
त्याचवेळेस बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड हे गस्त घालत असताना फळाच्या दुकानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने गर्दी कमी केली व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, होमगार्ड नामदेव शिंदे व जुबेर यांच्यात वाद झाला. यावेळी जुबेरने सरकारी कामात अडथळा आणल्याने त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वाद सुरू असताना मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. रहदारीला अडथळा आणणे, शासनाने दिलेले कुठलेही नियम न पाळणे आदी कारणांवरून पालिकेचे अधिकारी संजय बाणाईते यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात फळ विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, हाताला काम नाही, वेळेच्या आतच मिळेल ते काम करावे. यामुळे बिघडलेल्या मानसिकतेतून शहरात अशा अनेक घटना घडताना दिसून येत आहेत.