दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारीही जळगावच्या बाजारपेठत प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:36 PM2017-10-15T22:36:39+5:302017-10-15T22:38:04+5:30
पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंच्या थाटल्या दुकान
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15- एरव्ही रविवारी बंद असणा:या जळगावच्या बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी रविवार, 15 रोजी सकाळपासून सायंकाळर्पयत बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, दिवाळीला सोमवारी वसू बारसने प्रारंभ होत आहे.
गेल्या आठवडय़ापासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. मात्र रविवारी चाकरमान्यांना सुट्टी असल्याने ते खरेदीसाठी बाहेर पडले होते. दिवाळीपूर्वीचा रविवार असल्याने व्यावसायिकांनीदेखील रविवारी आपले दालने खुली ठेवली. यामध्ये महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात कपडय़ांची दुकाने सुरू होती व खरेदीसाठी त्या ठिकाणी तरुणाईसह पुरुष, महिला, लहान मुलांची गर्दी झालेली होती. या सोबतच टॉवर चौक ते घाणेकर चौक या दरम्यान पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंची दुकाने थाटली होती.
आकाशकंदील, रोषणाईला प्राधान्य
लक्ष्मीपूजनाला चार दिवसांचा अवकाश असला तरी वसू बारसपासूनच घर व इतर ठिकाणी रोषणाई करण्यास महत्त्व दिले जाते. त्यामुळे रविवारी आकाशकंदील, विविध प्रकारच्या रंगीत दिव्यांच्या माळा (लाईटिंग) खरेदीला प्राधान्य दिले जात होते. बाजारात 100 रुपये ते 800 रुपयांर्पयत विविध प्रकारचे आकाशकंदील उपलब्ध आहे.
पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबग
बाजारपेठेत थाटलेल्या पूजा साहित्याच्या प्रत्येक दुकानावर गर्दी झालेली होती. केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासे यांची आजच खरेदी करून ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले. लक्ष्मीच्या मूर्ती 60 रुपये ते 300 रुपयांर्पयत उपलब्ध आहे. या सोबतच लक्ष्मीपूजनात अनन्य महत्त्व असलेल्या केरसुणी 20 रुपये 40 रुपये प्रति नग विक्री होत आहे. यामध्ये लहान आकाराच्या केरसुणींनादेखील मागणी असून त्या 15 रुपयांपासून उपलब्ध आहे. या सोबतच लाह्या 60 रुपये किलो तर बत्तासे 70 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहे.
विविध रंगांच्या रांगोळींना मागणी
लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी अंगणात रांगोळी काढण्यालादेखील मोठे महत्त्व असल्याने विविध रंगांच्या रांगोळींनी दुकाने सजली आहेत. पांढरी रांगोळी 10 रुपये किलो विक्री होत असून पाच रुपयांपासून पाकीट उपलब्ध आहे.
घर, अंगण उजळून टाकणा:या पणत्या विविध आकार, प्रकारात विक्रीस आल्या असून त्या वेगवेगळ्य़ा रंगातदेखील दिसून येत आहे. पारंपारिक गोलाकार पणत्यांसह नक्षीकाम केलेल्या पणत्या लक्ष वेधून घेत आहे. या सोबतच बोळकेदेखील वेगवेगळ्य़ा रंगात उपलब्ध आहेत.
पावले, स्वस्तिकच्या स्टीकरलाही मागणी
दरवाजा, देव्हा:यासमोर रंगीत पावले, वेगवेगळ्य़ा नक्षी, स्वस्तिकचे स्टीकर लावण्यालादेखील हल्ली पसंती दिली जात आहे. त्यामुळे त्यांचीदेखील अनेक दुकाने लागली असून त्या ठिकाणीही मोठी उलाढाल होत आहे. दहा रुपयांपासून 80 रुपयांर्पयत हे स्टीकर उपलब्ध आहे.
एरव्ही रविवारी शुकशुकाट असणा:या महात्मा फुले मार्केटमध्ये आज वाहनतळही अपूर्ण पडले. तेथे वाहने लावण्यास जागा नव्हती. अनेक जण बाहेर इतरत्र वाहने लावून खरेदी करताना दिसून आले.
वाहनधारकांची कसरत
संध्याकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी एवढी गर्दी वाढली की, रस्त्यांवरून वाहने काढणेदेखील कठीण झाले होते. त्यामुळे टॉवर चौक, चित्रा चौक, नवीपेठ या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
आज वसूबारस
अश्वीन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्सद्वादशी वसुबारस असते. 16 रोजी ती आहे. सायंकाळी गायीची वासरासह पूजन करण्याचा प्रघात आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स धेनूचे पूजन करण्यात येते. भारताची कृषीप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्य महत्त्व आहे. गायीचे वासरुसह पादप्रक्षालन करुन पूजन व औक्षण करण्यात येते. त्यानंतर बाजरीची भाकरी, पुरणपोळी आदी नैवेद्य अर्पण करण्यात येतो, याच दिवशी गुरुद्वादशी आहे. त्यामुळे गुरुपूजन नामजपाला या पर्वात महत्त्व आहे.