चोपडा येथे मुद्रांक खरेदीसाठी गर्दी
By admin | Published: April 25, 2017 02:00 PM2017-04-25T14:00:45+5:302017-04-25T14:00:45+5:30
25 रोजी काही मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना नूतनीकरण झाल्याने ट्रेझरी कार्यालयातून मुद्रांक मिळाल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली.
Next
चोपडा,दि.25- येथील मुद्रांक विक्रेत्यांच्या परवाना नूतनीकरण अभावी तालुक्यात मुद्रांक मिळणे बंद झाले होते. 1 एप्रिल पासून ते 19 तारखेपयर्ंत नागरिकांना कोणत्याच रकमेचा मुद्रांक मिळत नव्हता. 25 रोजी काही मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना नूतनीकरण झाल्याने ट्रेझरी कार्यालयातून मुद्रांक मिळाल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली.
मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याची मुदत एका वर्षासाठी असते. 31 मार्च नंतर परवाना नूतनीकरण केल्याशिवाय त्यांना मुद्रांक विक्रीसाठी मिळत नाही .चोपडा तालुक्यात एकूण 17 मुद्रांक विक्रेते आहेत .त्यापैकी केवळ सात ते आठ मुद्रांक विक्रेते मुद्रांक विक्री करतात.