कुंड्यापाणी येथे भोंगऱ्या बाजाराला अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 07:32 PM2019-03-17T19:32:19+5:302019-03-17T19:32:48+5:30

आनंदाला उधाण

The crowded market at Kundanapani | कुंड्यापाणी येथे भोंगऱ्या बाजाराला अलोट गर्दी

कुंड्यापाणी येथे भोंगऱ्या बाजाराला अलोट गर्दी

Next

बिडगाव, ता.चोपडा : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कुंड्यापाणी येथे रविवारी भरलेल्या भोंगऱ्या बाजाराला आदिवासी बांधवांनी अलोट गर्दी केली होती. ठिकठिकाणाहून आलेल्या ढोलांच्या तालावर बेधुंत होत नाचणाºया आदिवासी बांधवांच्या आनंदाला यावेळी उधाण आले होते.
अडावद पो.स्टे.चे सपोनि राहुल पाटील यांच्याहस्ते ढोलपूजन करण्यात आले. या वेळी त्यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. पोलीस पाटील मुसा तडवी, ग्रा.पं.सदस्य दिलदार तडवी, बिडगावचे पोलीस पाटील रामकृष्ण पाटील, कादर तडवी आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्याहस्ते कुलदैवता आई देवमोगरा मातेचे व ढोलांचे पूजन करण्यात आले. पानशेवडी, बढाई, कुंड्यापाणी, चाण्या तलाव, शेवरे, धानोरा, बढवाणी तसेच विविध पाड्यांवरून मोठ्या प्रमाणावर ढोलपथकासह आलेल्या तरूण-तरूणी, अबाल-वृद्धांनी ढोल व आदिवासी वाद्यांवर आकर्षक पेहराव करून बेधुंत होत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.
बाजारामध्ये पाळणे, पालख्या, खेळणी, विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांनीही हजेरी लावली होती. रविवारी या बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. अडावद पो.स्टे.चे सपोनि राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
होळीच्या आठ दिवस आधी ठिकठिकाणी वाड्यावस्त्यांवर आयोजित भोंगºया बाजाराने सातपुड्याच्या पायथ्याशी सध्या आनंदाचे उधाण आले आहे. दºयाखोºयातून ढोल व आदिवासी गीत, वाद्यांचा आवाज घुमत आहे. आदिवासी संस्कृतीची जपवणूक व दर्शन या उत्सवातून घडत आहे.

Web Title: The crowded market at Kundanapani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव