लस घेण्यासाठी वरणगावी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:05+5:302021-07-07T04:20:05+5:30
वरणगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडचे लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यासाठी नागरिक सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहूनदेखील लस ...
वरणगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडचे लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यासाठी नागरिक सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहूनदेखील लस मिळण्याची आशा मावळल्यामुळे सोमवारी एकच गोंधळ उडाला होता.
सोमवार रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीचे ३०० डोस उपलब्ध झाले होते. त्यामध्ये नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती, तर उर्वरित २३५ लसींमध्ये नवीन व दुसरी लस घेणाऱ्यांसाठी लस मिळणार होती. त्याप्रमाणे योग्य नियोजन करून ३०० कूपन वाटणे अनिवार्य होते. परंतु तसे न झाल्यामुळे व गर्दी वाढतच गेली आणि त्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला.
पोलिसांनी घेतली धाव
शेवटी वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांनी आपल्या पथकासह रुग्णालयात धाव घेतली. लस घेतलेले व कूपन वाटप केलेले यांची आकडेवारी त्यांनी तपासून पाहिली. तसेच उर्वरित लोकांना कूपन वाटण्याच्या सूचना केल्या. जमलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून संयम पाळण्याच्या सूचना केल्या. परंतु नियोजनाअभावी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत ताटकळत उभे असलेल्या व कूपन न मिळालेल्या नागरिकांच्या पदरी मात्र निराशाच पडली. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
फोटो .. लस मिळण्याची आशा धुसर झाल्यामुळे नागरिकांची गेटसमोर अशी गर्दी उसळली होती. (छाया : बाळू चव्हाण) .०६/७