जमावबंदी पायदळी, बाजारपेठेत गर्दीच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:44+5:302021-06-29T04:12:44+5:30
अमळनेर : दुपारी चारनंतर संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीत शहरात ‘कही पे बंद कही पे शुरू’ असा संमिश्र प्रतिसाद आढळून आला. ...
अमळनेर : दुपारी चारनंतर संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीत शहरात ‘कही पे बंद कही पे शुरू’ असा संमिश्र प्रतिसाद आढळून आला. रविवारी निर्बंधाचा पहिला दिवस होता, तर दुपारी ४ नंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा सोमवार हा पहिला दिवस होता. सोमवारी बाजारपेठेत दुपारी ४ नंतरही गर्दी होती. काही दुकाने बंद, तर काही दुकाने उघडी, अशी स्थिती सोमवारी दुपारी ४ नंतर दिसून आली.
डेल्टा प्लसचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्यानंतर पुनश्च निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र रविवारी विक्रेते आणि नागरिकांनी आदेश झुगारून लावले होते. प्रशासनाने पहिला दिवस म्हणून दुर्लक्ष केले. मात्र सोमवारी ४ वाजता दुकाने बंद झाली पाहिजे होती. परंतु पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख राध्येश्याम अग्रवाल आणि पोलीस पथकाने दुपारी ४ वाजता दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स, भाजीपाला मार्केट, कुंटे रोड आदी ठिकाणी व्यापाऱ्यांनी हळूहळू दुकाने बंद करायला सुरुवात केली.
बाजार समितीच्या व्यापारी संकुलात सर्वच दुकाने बिनधास्त उघडी होती. सुभाष चौक, झामी चौक परिसरात काही दुकाने बंद तर काही सुरू होती. मात्र ५ वाजेनंतर जोरदार पावसाने सुरुवात केल्याने बाजारातून ग्राहक आपोआपच गायब झाले होते. भेळ, हॉटेल, फाइल विक्रेते तसेच चहाची दुकाने उघडी होती.
हातगाडी विक्रेते, किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने राजरोस उघडी
तरीदेखील हातगाडी चालक, किरकोळ विक्रेते राजरोसपणे काही विनामास्क व्यवहार करत होते. सिंधी बाजारात नावाला अर्धवट दुकाने बंद ठेवली होती. भागवत रोड परिसरात दुकाने सुरूच होती. बसस्थानक परिसरात देखील दुकाने सुरू होती.
जमावबंदीचे आदेश पायदळी
जमावबंदीच्या आदेशाचे मात्र पालन झालेले दिसून आले नाही. नागरिक सर्वत्र गर्दी करून होते, तर अनेक नागरिक विनामास्क फिरत होते.
===Photopath===
280621\28jal_11_28062021_12.jpg~280621\28jal_12_28062021_12.jpg~280621\28jal_13_28062021_12.jpg
===Caption===
अमळनेर शहरात सोमवारी चार वाजेनन्तर ‘ कही पे बंद, कही पे शुरू’ अशी स्थिती आढळून आली. पालिका कर्मचारी व पोलीस बंदचे आवाहन करीत होते. (छाया : अंबिका फोटो)~अमळनेर शहरात सोमवारी चार वाजेनन्तर ‘ कही पे बंद, कही पे शुरू’ अशी स्थिती आढळून आली. पालिका कर्मचारी व पोलीस बंदचे आवाहन करीत होते. (छाया : अंबिका फोटो)~अमळनेर शहरात सोमवारी चार वाजेनन्तर ‘ कही पे बंद, कही पे शुरू’ अशी स्थिती आढळून आली. पालिका कर्मचारी व पोलीस बंदचे आवाहन करीत होते. (छाया : अंबिका फोटो)