भंगाळेंना अटक होताच समर्थकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:28+5:302021-06-18T04:12:28+5:30
जळगाव : भागवत भंगाळे यांना अटक केल्यानंतर त्यांचे कुटुंबीय, समर्थक यासह विविध राजकीय पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा ...
जळगाव : भागवत भंगाळे यांना अटक केल्यानंतर त्यांचे कुटुंबीय, समर्थक यासह विविध राजकीय पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे व त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली होती. आमदार सुरेश भोळे यांनीदेखील पोलीस ठाणे गाठले होते. दरम्यान, अटक केलेले बहुतांश जण आमदार गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्या जवळचे आहेत.
सुनील झंवर, कंडारे अद्यापही फरारच
बीएचआरमधील अपहार व फसवणूक प्रकरणात सुनील झंवर, जितेंद्र कंडारे अद्यापही फरार आहेत. या गुन्ह्यात सुजीत सुभाष बाविस्कर (वय ४२, रा.पिंप्राळा), सी.ए.धरम किशोर सांखला (४०, रा. शिव कॉलनी), महावीर माणकचंद जैन (३७, रा. गुड्डूराजा नगर), विवेक देविदास ठाकरे (४५, रा.देवेंद्र नगर) यांना यापूर्वी अटक झालेली आहे. महावीर जैन, धरम सांखला या दोघांना जामीन मंजूर झालेला आहे. प्रकाश वाणी, अनिल पगारिया यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.